मुलीला थंडीपासून वाचवण्यासाठी या डॉननं जाळले होते 15 कोटी रूपये, संपत्ती वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:02 IST2025-04-02T15:54:32+5:302025-04-02T16:02:23+5:30
Who was Pablo Escobar: एकेकाळी त्याच्याकडे या धंद्यातून 25 बिलियन डॉलर इतकी संपत्ती जमा झाली होती. तो एका राजासारखं जीवन जगत होता. त्याच्याकडे इतके पैसे होते की, गोदामातील कोट्यावधी रूपये उंदरांनी खाऊन टाकले होते.

Who was Pablo Escobar: जगातील अनेक ड्रग डीलर म्हणजेच ड्रग लॉर्डच्या अजब कहाण्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. ड्रगचं नाव आलं की, असा ड्रग डीलर होऊन गेला ज्याची चर्चा आजही होते. पाब्लो एस्कोबार असं त्याचं नाव. एकेकाळी त्याच्याकडे या धंद्यातून 25 बिलियन डॉलर इतकी संपत्ती जमा झाली होती. तो एका राजासारखं जीवन जगत होता. त्याच्याकडे इतके पैसे होते की, गोदामातील हजारो रूपये उंदरांनी खाऊन टाकले होते.
कोलंबियाचा ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार या धंद्यातील सगळ्यात मोठं नाव होतं. आजही त्याच्या इतका मोठा ड्रग माफिया कुणी नाही. सगळ्यात श्रीमंत गुन्हेगार ज्याच्याकडे अब्जो रूपयांची संपत्ती होती. पैसे कमावण्यासोबतच तो पैसे उडवण्यातही पुढे होता. एक दिवस त्यानं त्याच्या मुलीली थंडी वाजत होती म्हणून शेकोटी पेटवून त्यात 15 कोटी रूपये जाळले होते.
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पाब्लो एस्कोबारची ड्रगच्या विश्वावर इतकी पकड होती की, तो दर आठवड्याला 42 कोटी डॉलर इतकी कमाई करत होता. एकदा तो पोलिसांपासून वाचण्यासाठी एका डोंगराळ भागात लपून होता. त्यावेळी त्याची मुलगीही त्याच्यासोबत होती. त्याच्या मुलीला थंडीमुळे हायपोथर्मिया झाला होता. मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यानं कशाचाही विचार न करता 20 लाख डॉलर म्हणजेच साधारण 15 कोटी रूपये जाळून राख केले होते. जेणेकरून तापमान कमी करता यावं.
एका मीडिया रिपोर्टनुसार, पाब्लो एस्कोबारकडे इतकी संपत्ती होती की, तो ती सांभाळूही शकत नव्हता. तो दररोज 400 कोटी रूपये कमावत होता. त्याच्याकडे इतकी रक्कम होती की, ती सुरक्षित ठेवणंही त्याला जमत नव्हतं. त्यामुळे उंदरांनी कोट्यावधी रूपये खाऊन टाकले होते. तर उदळी लागल्यामुळे अब्जो रूपये वाया गेले होते.
पाब्लो एस्कोबार जगातील सगळ्यात मोठा ड्रग माफिया होता आणि त्याचं साम्राज्य इतकं मोठं होतं की, जगातील 80 टक्के कोकिन तोच तयार करत होता. ड्रग तस्करीसाठी त्यानं जवळपास 15 हजार लोकांचा जीव घेतला. 1989 मध्ये फोर्ब्स मॅगझीननं त्याला सातवा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती घोषित केलं होतं. त्याची एकूण संपत्ती 25 बिलियन डॉलर इतकी होती.
पाब्लो एस्कोबारची हत्या 2 सप्टेंबर 1993 मध्ये करण्यात आली. पोलिसांपासून बचाव करत तो कोलंबियातील घरातून पळून जात होता. तेव्हा त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. याबाबत अनेक कहाण्या प्रचलित आहेत. काही लोक म्हणतात की, त्यानं स्वत:वर गोळ्या झाडल्या. तर काही म्हणतात त्याची सत्ता मिळवण्यासाठी काहींनी त्याची हत्या केली. पण सत्य कधी समोर आलं नाही.