रुसून बसली प्रेमाची स्वारी; म्हणून या प्रियकरांनी लढवली शक्कल न्यारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 11:45 IST2018-10-24T14:37:37+5:302018-10-25T11:45:49+5:30

पिंपरी चिंचवडमधला हा किस्सा अनेकांच्या आजही लक्षात असेल. काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 300 होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यानं या होर्डिंगवर प्रेयसीचं नाव छापून तिची माफी मागितली होती. या प्रेमवीराचं नाव निलेश खेडकर असल्याची माहिती तपासातून पुढे आली. प्रेयसीची माफी मागण्यासाठी त्यानं हा सारा खटाटोप केला. यासाठी त्यानं 72 हजार रुपये खर्च केले.

गर्लफ्रेंडला गिफ्ट काय द्यायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. काहीतरी वेगळं गिफ्ट द्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र हे वेगळं काय हा प्रश्न असतोच. याच वेगळपणाच्या विचारातून 2017 मध्ये एका चिनी तरुणीनं प्रेयसीला चक्क उल्का पाषाण गिफ्ट म्हणून दिलं. या पाषाणाची किंमत होती तब्बल 83 लाख..

प्रेमात कोण काय करेल काही सांगता येत नाही. 2014 मध्ये चीनची राजधानी बीजिंगमध्ये एका प्रेमवीरानं मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी 48 लाख रुपये खर्च करुन 99 आयफोन 6S खरेदी केले. या फोनपासून एक हृदयाची आकृती तयार करुन त्यात प्रेयसीला उभं करुन त्यानं तिला प्रपोज केलं.

इतकं करुनही उपयोद शून्यच. कारण मैत्रिणीनं प्रपोजल स्वीकारलंच नाही. तिनं लग्नासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. यामुळे बिचाऱ्या प्रेमवीराची चारचौकात शोभा झाली.

2018 मध्ये बनारसमधल्या एका प्रियकरानं हटके पद्धतीनं प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला. याची चर्चा संपूर्ण शहरात होती. या प्रियकरानं संपूर्ण शहरभर पोस्टर लावले. त्यावर हॅप्पी बर्थडे स्वीटहार्ट असा मजकूर होता. यावर प्रियकरानं ना स्वत:चं नाव लिहिलं ना प्रेयसीचं. त्यामुळे ही पोस्टर्स लावली कोणी, असा प्रश्न शहरवासीयांना पडला.