अबब! 1767 कोटी रूपयांचा 5 बेडरूम असलेला महाल, फोटो बघाल तर उडेल झोप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:31 IST2025-02-21T15:07:36+5:302025-02-21T15:31:51+5:30
Marble palace : केवळ पाच खोल्या असलेल्या घराची किंमत इतकी आहे की, ऐकून झोप उडेल.

Marble Palace Dubai: महागड्या घरांचा किंवा बंगल्यांचा विषय निघतो तेव्हा दुबईच्या किंगच्या बंगल्याची किंवा मग मुकेश अंबानी यांच्या एंटीलियाची आठवण येते. 15000 कोटी रूपये खर्च करून बांधलेलं हे अनेक दृष्टीनं खास आहे. मात्र, ज्या पॅलेसबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ते दुबईची शान म्हणून सगळीकडे ओळखलं जातं.
दुबईतील हे घर आपल्या खास बांधकामामुळे आणि किंमतीमुळे चर्चेत आहे. केवळ पाच खोल्या असलेल्या घराची किंमत इतकी आहे की, ऐकून झोप उडेल. तुम्हालाही प्रश्न पडेल की, या घरात इतकं काय आहे?
जगभरातील श्रीमंत लोकांनी दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. इथे रिअल इस्टेटची मोठी मागणी आहे. दुबईमध्ये एक ठिकाण आहे 'मार्बल पॅलेस'. जेव्हा तुम्ही याची खासियत वाचाल तर समजून जाल की, त्याची इतकी किंमत का आहे.
अल्ट्रा-लक्झरी पॅलेस मार्बल पॅलेस दुबईच्या सगळ्यात श्रीमंत भाग म्हणजे अमीरात हिल्स भागात आहे. या हवेलीचं नाव मार्बल पॅलेस ठेवण्यात आलं आहे.
या महालात केवळ 5 बेडरूम आहेत. मात्र, बाथरूम 19 आहेत. बेडरूम, बाथरूमशिवाय डायनिंग एरिया, 15 कारचं पार्किंग, इनडोर आणि आउटडोर स्वीमिंग पूल, एक कोरल रीफ अॅक्वेरिअम आणि गोल्फ कोर्सही आहे.
खास बाब ही आहे की, 60, 000 वर्ग फुट परिसरात पसरलेल्या या प्रॉपर्टीमधील मास्टर बेडरूमची साइज 4 हजार वर्ग फुट इतकी आहे. म्हणजे या बेडरूममध्ये एक मोठा 4 बीएचके फ्लॅट बनू शकतो.
दुबईतील हे मार्बल पॅलेस महालापेक्षा कमी नाही. याचं बांधकाम करण्यासाठी इटालियन संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. तर हा महाला बांधण्यासाठी 100 मिलियन दीरम इतका खर्च आला. हा बांधणाऱ्या कंपनीनं याच्या विक्रीची जबाबदारी Luxhabitat Sotheby's International Realty ला दिली आहे.
हा महाला बनवण्यासाठी 12 वर्ष इतका कालावधी लागला. 2018 मध्ये हा पॅलेस तयार झाला. पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठीचे गेस्ट रूम 1 हजार वर्ग फुटाचे आहेत.
सोथबी इंटरनॅशनल रियाल्टीच्या वेबसाईटवर या मार्बल पॅलेसची किंमत साधारण 17,67,74,26,200 रुपये इतकी दाखवण्यात आली आहे. यात एक जिम, थिएटरही आहे.