नशीब फळफळले, दोनदा लॉटरी जिंकली अन् करोडपती बनला 'हा' व्यक्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 16:33 IST2021-08-12T16:22:52+5:302021-08-12T16:33:35+5:30

ottery jackpot : लॉटरी जिंकल्यानंतर या व्यक्तीला 2,27,31,250 रुपये मिळाले.

नशीब बदलायला वेळ लागणार नाही असे म्हणतात. अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत असेच काही घडले. या व्यक्तीने दोन आठवड्यांत दोनदा लॉटरी जिंकली आणि करोडपती बनला.

दक्षिण कॅरोलिनामधील या व्यक्तीने दोन आठवड्यांपूर्वी 40,000 डॉलर्स म्हणजेच 29,70,162 रुपयांची लॉटरी जिंकली होती.

त्यानंतर पुन्हा याच व्यक्तीचे नशीब फळफळले आणि 14 दिवसांत आणखी 3 मिलियन डॉलर्सचा जॅकपॉट जिंकला. ही लॉटरी जिंकल्यानंतर या व्यक्तीला 2,27,31,250 रुपये मिळाले.

दोन वेळा लॉटरी जिंकणाऱ्या या व्यक्तीने साऊथ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, 40,000 डॉलर्सच्या मेगा मिलियन्स पुरस्कारानंतर स्वत:ला नशीबवान असल्याचे वाटत होते.

त्यामुळे 27 जुलै रोजी कारमध्ये इंधन भरण्यासाठी मर्फी यूएसए गॅस स्टेशनला भेट दिली आणि तेथे आणखी एक लॉटरी तिकीट विकत घेतले.

हा व्यक्ती म्हणाला की, माझ्या नशिबाच्या चांगल्या ओळी पुसल्या गेल्या नाहीत आणि दोन आठवड्यांनंतर 3 मिलियन डॉलर्सचा जॅकपॉट माझ्या हातात पडला.

"माझा विश्वासच बसत नव्हता, जेव्हा मी माझ्या कुटुंबीयांना सांगितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. तसेच, मी मुलांना विचारलं, 'असं का होतंय?" असे लॉटरी जिंकणारा व्यक्ती म्हणाला.

लॉटरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेगा मिलियन्स खेळताना 40,000 डॉलर्स जिंकण्याची शक्यता 931,001 मधून कोणत्याही एकाची असते. तर 3 मिलियन डॉलर्स जिंकण्याची शक्यता 13 मिलियन लोकांमधून कोणत्याही एका व्यक्तीची होते.

Read in English