शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लय भारी! महाराष्ट्राच्या शेतकऱ्यानं जुगाडाने बुलेटला बनवलं ट्रॅक्टर अन् आता लाखो रूपये वाचवून करतोय शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 5:51 PM

1 / 9
भारतातील लोक जुगाडाच्या बाबतीत खूपच हूशार असल्याचे दिसून येतं. आतापर्यंत जुगाडाचे अनेक व्हिडीओज तुम्ही पाहीले असतील. यातील काही जुगाड आपल्याला खूप हसवतात तर काही मोठ्या आश्चर्याचे उदाहरण ठरतात. असाच काहीसा जुगाड महाराष्ट्रातील लातूरमधील शेतरकऱ्यानं केला आहे.
2 / 9
या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर विकत घ्यायला पैसै नव्हते म्हणून त्यानं जुगाड करत आपल्या बुलेटलाच ट्रॅक्टर बनवलं आहे. आता हे ट्रॅक्टर वापरून सोप्या पद्धतीनं शेती केली जाऊ शकते. या पद्धतीनं अशा लोकांचा फायदा होईल जे महागडा ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत.
3 / 9
लातूरमधील रहिवासी असलेले मकबूल हे गृहस्थ शेतकरी असून ऑटोमोबाईल एक्सपर्ट्ससुद्धा आहेत. गावात कोणाचीही गाडी खराब झाल्यानंतर ते लगेचच दुरूस्त करून देतात. आता मकबूल यांनी असा ट्रॅक्टर बनवला आहे जो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा ट्रॅक्टर जुन्या बुलेटपासून तयार करण्यात आला आहे.
4 / 9
आपल्या या अविष्काराबाबत बोलताना मकबूल यांनी सांगितले की, ''लहान शेतकऱ्यांना ९ ते १० लाखांचा ट्रॅक्टर घेणं शक्य होत नाही. त्यामुळे शेतीची काम चांगल्या पद्धतीने करता येत नाहीत. यामुळेच मी स्वतःच ट्रॅक्टर तयार करण्याचा निर्णय घेतला.''
5 / 9
आपल्या बुलेट ट्रॅक्टरबाबत बोलताना मकबूल यांनी सांगितले की, ''साधारण ट्रॅक्टरच्या तुलनेत हा ट्रॅक्टर खूपच स्वस्त आहे. एका टॅक्टरसाठी जवळपास १० लाखांचा खर्च येतो. पण हाच बुलेट ट्रॅक्टर लोक दीड लाख रुपयांना विकत घेऊ शकतात. यामुळे शेती करणं खूप सोपं होतं.''
6 / 9
आता हा ट्रॅक्टर बनवून घेण्यासाठी लांबून लांबून लोक येत आहेत. आतापर्यंत मकबूल यांनी १४० ट्रॅक्टर तयार करून त्यांची डिलिव्हरी केली आहे. या ट्रॅक्टरमुळे शेती करण्याची पद्धत खूपच बदलली आहे.
7 / 9
मकबूलनं २०१६ मध्ये ट्रॅक्टरची आयडीया दिली होती. दोनवर्षांनी यांनी आपला बुलेट टॅक्टर तयार केला आहे. सध्या या जुगाडाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. आता मकबूल यांना मोठ्या संख्येनं ऑर्डर्स मिळत आहेत.
8 / 9
मकबूल यांनी ट्रॅक्टरनं शेतात एकापेक्षा जास्त कामं केली आहे. यात १० होर्स पावरचं इंजिन आहे. ज्यामुळे पेरणी खूप चांगली होते.
9 / 9
मकबूल यांनी ट्रॅक्टरनं शेतात एकापेक्षा जास्त कामं केली आहे. यात १० होर्स पावरचं इंजिन आहे. ज्यामुळे पेरणी खूप चांगली होते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलlaturलातूर