जाणून घ्या, जगातील हे टॉप 5 देश सर्वात जास्त करतात भारताचा द्वेष; काय आहेत कारणं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:09 PM2019-09-23T15:09:37+5:302019-09-23T15:18:04+5:30

आपला भारत देश जगातील सर्व देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काही कारणांमुळे जगातील काही देश भारताबाबत द्वेष ठेवतात. यामागे नेमकी कारणे काय याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

श्रीलंका - भारत आणि श्रीलंका यांच्यात कोणतंही युद्ध नाही तरीही तेथील लोक भारताचा द्वेष करतात. कारण त्या देशात राहणाऱ्या तामिळी लोकांमुळे देशाचा विकास होऊ शकला नाही याचा राग श्रीलंकेतील लोकांच्या मनात आहे. भारताची ताकद जास्त असल्याने ते थेट तामिळींबाबत बोलू शकत नाहीत मात्र त्यांच्या मनात हा राग कायम आहे.

पोर्तुगाल - दक्षिण पश्चिम युरोपमधील या देशाच्या मनात भारताबद्दल विशेष राग आहे. 1960 पर्यंत गोवा हा भारताचा भाग नव्हता. मात्र 1961 मध्ये भारताने युद्ध करुन गोवा आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे पोर्तुगालमधील लोकांच्या मनात भारताबद्दल आकस आहे. मात्र पोर्तुगालची युवा पिढी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करतात.

ऑस्ट्रेलिया - भारतीय बुद्धिमान आणि मेहनती असतात त्यामुळे ऑस्ट्रेलियात अनेक भारतीयांना नोकऱ्या दिल्या जातात. त्यामुळे तेथील नागरिकांना भारतीयांबद्दल द्वेष आहे. तसेच क्रिकेटमधील प्रतिस्पर्धी म्हणूनही भारताचा द्वेष केला जातो.

चीन - जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, गेल्या काही वर्षांपासून चीनने भरपूर प्रमाणात विकास केला आहे. मात्र चीनच्या या विकासाला भारत बरोबरीची टक्कर देऊ शकतो अशी भीती चीनच्या मनात कायम असते. त्यामुळे प्रत्येकवेळी चीन भारताचा विश्वासघात करते. दहशतवादाच्या मुद्द्यावरही चीनने भारताविरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिला

पाकिस्तान - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विभाजनामुळे या दोन्ही देशातील लोकांच्या मनात एकमेकांविषयी द्वेष आहे. या दोन्ही देशांमध्ये नेहमी युद्धजन्य परिस्थिती असते. प्रत्येकवेळी पाकिस्तानला भारतासमोर झुकावं लागतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही चीनशिवाय इतर कोणताही देश त्यांना पाठिंबा देत नाही. पाकिस्तानचे नेतेमंडळी नेहमी भारतासोबत युद्धाची भाषा वापरतात.