जगातील सर्वात जूने शाकाहरी रेस्टॉरंट भारतात नव्हे तर 'या' ठिकाणी आहे, पाहा photos

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:35 PM2021-11-22T19:35:08+5:302021-11-22T19:50:46+5:30

जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट अशा देशात उघडण्यात आले जेव्हा तेथील लोकांनी शाकाहाराचा विचारही केला नव्हता. तुम्हाला असे वाटेल हे रेस्टॉरंट भारतात आहे. पण तुमचा समज चूकीचा आहे. कुठे आहे हे रेस्टॉरंट घ्या जाणून...

जगातील सर्वात जुन्या शाकाहारी रेस्टॉरंटबद्दल बोलताना भारताचं नाव आपल्या मनात येत असेल, पण तसं नाहीय. जगातील सर्वात जुने रेस्टॉरंट झुरिच, स्वित्झर्लंड येथे आहे, जे १८९८ पासून सुरू आहे.

या पूर्णपणे शाकाहारी रेस्टॉरंटचे नाव हौस हिल्ट (Haus Hiltl) आहे, जे एकाच कुटुंबातील लोक पिढ्यानपिढ्या वारसा म्हणून चालवत आहेत.

अगदी शुद्ध शाकाहारी शैलीमुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (guinness book of world record) नोंदवले गेले आहे. इथं भारतीय पद्धतीची थाली पद्धतही आहे.

सुमारे १२० वर्षांपूर्वी हिल्ट कुटुंबातील अॅम्ब्रोसियस हिल्ट (Ambrosius Hiltl) यांनी शहराला त्यांच्या कुटुंबातील शाकाहारी पाककृतींची ओळख करून देण्यासाठी याची सुरुवात केली होती. तेव्हा याचं नाव Vegetarierheim आणि Abstinence-Café असं होतं.

इथल्या मेनूमध्ये फक्त बटाटे आणि इतर मूळ भाज्या असायच्या. तेव्हापासून या रेस्टॉरंटचे नाव अनेकदा बदलले आहे. मेनूमध्ये डिशेस देखील जोडल्या गेल्या. मात्र, इथली एक गोष्ट अजूनही बदलली नाही ते म्हणजे शाकाहारी जेवण.

त्यावेळी युरोपमध्ये शाकाहार नगण्य होता आणि डुक्कर आणि गायींचे मांस प्रामुख्याने खाल्ले जात असे. जे फळे आणि हिरव्या भाज्या खायचे त्यांनी हिप्पी म्हणून पाहिले जात होते, म्हणजे अशी तरुण पिढी जी खाण्यासाठी भटकी आहे आणि ज्यांना प्रत्येक गोष्टीत प्रयोग करायचे आहेत.

अशा परिस्थितीत हे रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर शहरात विविध गोष्टी घडल्या. शुद्ध हिरव्या पालेभाज्या देणारे हे रेस्टॉरंट अतिशय वाईट नजरेने पाहिले जात होते. हिल्ट कुटुंबाला मूर्ख आणि अगदी वेडे म्हणून हिणवले जाऊ लागले. या परिस्थितीतही कुटुंबाने रेस्टॉरंट बंद केले नाही आणि अखेरीस ते वेगळेपणामुळे प्रसिद्धीस आले.

शाकाहार आणि शाकाहारी जीवनशैलीचे फायदे समोर आल्यानंतर 1951 पासून या रेस्टॉरंटला प्रसिद्धी मिळू लागली.

आता फक्त स्विस पदार्थच नाही तर आशियाई, भूमध्यसागरीय, भारतीय अशा सर्व प्रकारच्या शाकाहारी चवी इथे मिळतात. येथील सर्वात खास डिश Zürcher geschnetzeltes आहे, जी एक शाकाहारी स्विस डिश आहे.

Haus Hiltl हे पाच मजली रेस्टॉरंट आहे, जिथे जेवणासोबतच हजारो पुस्तके देखील उपलब्ध आहेत. ही सर्व पुस्तके जगभरातील शाकाहारी पदार्थांबद्दल माहिती देतात.