या देशातील राजा दरवर्षी तरूण मुलींशी करतो लग्न, जाणून घ्या किती आहेत बायका..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 02:59 PM2021-10-05T14:59:58+5:302021-10-05T15:09:39+5:30

या देशात दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराणीच्या आईच्या शाही गावात म्हणजे लुदजिजिनीमध्ये उम्हलांगा सेरेमनीचं आयोजन केलं जातं.

देशाच्या राजावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात. ज्याचं त्यांना पालन करायचं असतं. राजाचं कर्तव्य असतं की, त्याने आपल्या जनतेच्य समजून घ्याव्या. जगातल्या जास्तीत जास्त देशातून राजेशाही संपली आहे. काही मोजक्याच देशात आजही राजेशाही आहे. त्यातीलच एक देश आहे आफ्रिकन देश स्वाजीलॅंड. येथील राजाबाबत वाचाल तर हैराण व्हाल.

देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्यावर येथील राजाने २०१८ मध्ये देशाचं नाव बदलून द किंगडम ऑफ इस्वातिनी केलं होतं. हा देश आफ्रिकन महाद्वीपवर दक्षिण आफ्रिकेला लागून आहे. दक्षिण आफ्रिका आणि मोजॅंबिकच्या सीमेला लागून असलेल्या देशाची येथील वेगवेगळ्या परंपरांमुळे चर्चा होत असते.

या देशात दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराणीच्या आईच्या शाही गावात म्हणजे लुदजिजिनीमध्ये उम्हलांगा सेरेमनीचं आयोजन केलं जातं. या फेस्टिव्हलमध्ये १० हजारांपेक्षा जास्त कुमारी तरूणी सहभागी होतात. येथील राजासमोर तरूणी डान्स करतात.

एका रिपोर्टनुसार, फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या तरूणींपैकी राजा दरवर्षी आपल्यासाठी एक राणी निवडतो. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या तरूणी निर्वस्त्र होऊन राजा आणि लोकांसमोर पारंपारिक डान्स करतात. या परंपरेचा देशातील अनेक तरूणींनी विरोध केला. तर अनेक तरूणींनी परेडमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. जेव्हा राजाला याबाबत समजलं तेव्हा तरूणींच्या कुटुंबियांना दंड भरावा लागला होता.

या देशाच्या राजावर नेहमीच आरोप लावले जाते की, तो फारच ऐशो-आरामाचं जीवन जगतो. तर त्याच्या राज्यातील लोक फारच गरिब आहेत. ते कसंतरी जीवन जगतात. २०१५ मध्ये भारत आफ्रिका शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी राजा मस्वाती तृतीय भारतात आल होता. राजा मस्वाती तृतीय त्याच्यासोबत त्याच्या १५ पत्नी, मुलं आणि १ हजार नोकरांना घेऊन आला होता. त्यांच्यासाठी दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये २०० रूम बूक करण्यात आल्या होत्या.