'इथे' लग्नानंतर नवरी नाही तर नवरदेवाला सोडावं लागतं आपलं घर, नवरा करतो घरातील कामे तर बायको बाहेरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 15:12 IST2026-01-17T14:51:01+5:302026-01-17T15:12:55+5:30

Interesting marriage tradition : तुम्हाला माहीत नसेल की, आपल्याच भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लग्नानंतर मुलींना नाही तर मुलांना आपलं घर सोडावं लागतं. चला तर पाहुया काय आहे ही प्रथा आणि कुठे आहे.

A place where boys leave their home after marriage: जगात वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात. ते वर्षानुवर्षे त्यांच्या संस्कृती फॉलो करत आले आहेत. प्रत्येक भागात रितीरिवाज वेगवेगळे असतात. मग ते सणावाराचे असो वा लग्न समारंभाचे असोत. लग्नाबाबत तर सगळ्यात जास्त रितीरिवाज आपल्या देशात असतील असा एक विचारही मनात येतो.

लग्नाबाबत आपल्याकडे खूपसाऱ्या प्रथा असतात. पण सामान्यपणे आपल्याकडे असो वा इतर कोणत्या देशात असो, मुलीला लग्नानंतर आपलं घर सोडून नवऱ्याच्या घरी जावं लागतं. जास्तीत जास्त ठिकाणी हाच रिवाज बघायला मिळतो. पण तुम्हाला माहीत नसेल की, आपल्याच भारतात एक ठिकाण असंही आहे जिथे लग्नानंतर मुलींना नाही तर मुलांना आपलं घर सोडावं लागतं. चला तर पाहुया काय आहे ही प्रथा आणि कुठे आहे.

जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणाबाबत आणि या प्रथेबाबत माहीत नसेल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ही अनोखी प्रथा भारतातील मेघालय राज्यातील एका खास समाजात पाळली जाते.

मेघालयाच्या चेरापुंजी भागातील खासी जमातीतील लोक ही प्रथा पाळतात. चेरापुंजी भागातील खासी जमातीमध्ये लग्न झाल्यावर मुलीऐवजी मुलाला घर सोडून मुलीसोबत रहायला जावं लागतं. पण पुढे काही दिवसांनी तो आपलं घर बदलतो.

या जमातीमध्ये आणखी एक जुनी परंपरा आहे. ज्या परंपरेनुसार सगळ्यात लहान मुलगी आई-वडिलांसोबत राहणार आणि त्यांची सेवा करणार.

घरातील मोठ्या मुली घर सोडून वेगळ्या होऊ शकतात. पण त्यासाठीही एक निश्चित काळ ठरवण्यात आला आहे. त्यानंतरच त्या घर सोडू शकतात.

खासी जमातीमध्ये एक खास बाब अशीही आहे की, इथे घरात महिलाच मुख्य असतात. त्याशिवाय आणखी एक बाब म्हणजे जेव्हा संपत्तीची वाटणी होते, तेव्हा मुलांना कमी आणि मुलींना जास्त वाटा दिला जातो. यात सगळ्यात जास्त वाटा आई-वडिलांसोबत राहणाऱ्या लहान मुलीला मिळतो.