आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:23 IST2025-09-15T18:15:58+5:302025-09-15T18:23:49+5:30
वाढत्या एकटेपणामुळे एक नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. 'या' देशातील अनेक महिला पैसे देऊन भाड्याने बॉयफ्रेंड घेत आहेत.

जपानमध्ये वाढत्या एकटेपणामुळे एक नवीनच ट्रेंड सुरू झाला आहे. येथील अनेक महिला पैसे देऊन 'भाड्याने बॉयफ्रेंड' घेत आहेत. कॉफी पिण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी किंवा फक्त गप्पा मारण्यासाठी या पुरुषांना एक तास किंवा पूर्ण दिवसासाठी बुक केले जाते.
कामाचा ताण, कुटुंबापासून दूर राहणे आणि मित्र-मैत्रिणींची कमतरता यामुळे वाढलेल्या एकटेपणावर मात करण्यासाठी हा एक अनोखा मार्ग जपानी महिलांनी शोधला आहे.
जपानमधील टोकियो आणि इतर मोठ्या शहरांमध्ये ही सेवा जास्त लोकप्रिय आहे. अनेक वेबसाइट्स आणि ॲप्सवर भाड्याने उपलब्ध असलेल्या मुलांचे प्रोफाईल असतात.
यामध्ये मुलांचे वय, व्यक्तिमत्त्व आणि आवड-निवड यासारखी माहिती दिलेली असते. महिला त्यांच्या आवडीनुसार प्रोफाईल निवडतात आणि त्यानुसार बॉयफ्रेंडला बुक करतात. या सेवेचा खर्च प्रति तास किंवा प्रति दिवसानुसार ठरलेला असतो.
ऑस्ट्रेलियातील एका महिलेने टोकियोमध्ये जाहिरातीद्वारे दोन तासांची डेट बुक केली. यासाठी तिने सुमारे १८ हजार रुपये खर्च केले आणि इतर खर्चही तिनेच उचलला. तिला नरूमी नावाच्या २६ वर्षीय मुलाचे प्रोफाईल आवडले आणि तिने त्याला बुक केले. तिला ही डेट इतकी आवडली की तिने अजून एक तास वाढवला, ज्यासाठी तिला अतिरिक्त पैसे द्यावे लागले.
जपानमध्ये ४७% पेक्षा जास्त लोक अविवाहित आहेत. त्यांना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळत नाही. विशेषतः ३०-४० वर्षांच्या महिलांना खूप एकटेपणा जाणवतो. अशा परिस्थितीत 'रेंटल बॉयफ्रेंड' सेवा त्यांना भावनिक आधार देत आहे.
अनेक महिला सांगतात की, त्यांना ऐकून घेणारं कोणी नाही आणि अशा वेळी हे रेंटल बॉयफ्रेंड त्यांना मानसिक आधार देतात. जपानमध्ये एकटेपणा ही एक मोठी सामाजिक समस्या बनली असून, या सेवेमुळे अनेक महिलांना दिलासा मिळत आहे.