विमानातील ऑक्सीजन मास्क किती वेळ वाचवू शकतो आपला जीव? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:37 IST2025-07-05T12:24:24+5:302025-07-05T12:37:16+5:30

Plane Oxygen Mask : विमानानं उड्डाण घेण्याआधी एअरहोस्टेस विमानासंबंधी काही नियम आपल्याला सांगतात. यावेळी त्या हेही सांगतात की, इमरजन्सी लॅडिंगच्या स्थितीत ऑक्सीजन माक्सचा वापर कसा करावा.

Plane Oxygen Mask : बऱ्याच वर्षांपासून विमानानं प्रवास करणं फार सोपं झालं आहे. त्यामुळे आजकाल बरेच लोक विमानानं प्रवास करतात. विमानानं प्रवास करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत. कमी वेळात आपण लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करू शकतो.

आपणही कधी विमानातून प्रवास केला असेल तर पाहिलं असेल की, विमानानं उड्डाण घेण्याआधी एअरहोस्टेस विमानासंबंधी काही नियम आपल्याला सांगतात. यावेळी त्या हेही सांगतात की, इमरजन्सी लॅडिंगच्या स्थितीत ऑक्सीजन माक्सचा वापर कसा करावा.

ऑक्सीजन मास्क आपल्या सीटच्या बरोबर वर लावलेले असतात, ज्यांचा योग्यवेळी तुम्ही वापर करू शकता. तेच या ऑक्सीजन मास्कला एकावेळी एकच व्यक्ती वापरू शकते. त्यामुळे विमानाच्या प्रत्येक सीटच्या वर मास्क दिलेला असतो.

ऑक्सीजन मास्कचा वापर कॅबिनमध्ये प्रेशर कमी झाल्यावर केला जातो. तसेच जेव्हा विमान १४ हजार फुट उंचीवर उडत असतं तेव्हा इतक्या उंचीवर एअरमध्ये ऑक्सीजन कमी होतं. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांना श्वास घेण्यास समस्या होते. या स्थितीत एअरहोस्टेस प्रवाशांना ऑक्सीजन मास्क लावण्याचा सल्ला देतात.

इमरजन्सी लॅंडिंगदरम्यानही प्रवाशांना ऑक्सीजन मास्कचा वापर करावा लागतो. तेच इमरजन्सीमध्ये या मास्कचा वापर करण्याचा आदेश पायलट देतो.

पायलट आपल्याला सांगतात की, या स्थितीत घाबरायचं नाहीये आणि मोठा श्वास घ्यायचा आहे. ज्यानंतर ऑक्सीजन मास्कचा वापर करायचा आहे.

पण जर एअर प्रेशर जास्त वेळ कमी राहिलं तर अनेक प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तेच विमानातील ऑक्सीजन मास्क आपल्याला जवळपास १५ मिनिटंच ऑक्सीजनचा सप्लाय देऊ शकतं. कारण १५ मिनिटात पायलट आपल्याला एका सुरक्षित ठिकाणी पोहोचवू शकतात.