एकाही झाडाला धक्का न लावता साकारलं घरकुल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 15:27 IST2019-11-14T15:22:38+5:302019-11-14T15:27:37+5:30

माणूस आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष जगात सगळीकडे पाहायला मिळतो. माणसांचं जंगलांवर होणारं अतिक्रमण वैश्विक समस्या आहे. मात्र जपानच्या योनागोमध्ये एक अफलातून प्रयोग करण्यात आला आहे.
चेरी आणि पाईन झाडांमध्ये बॉक्स टाकून घराची उभारणी करण्यात आली आहे.
हे बॉक्स एकमेकांना जोडून एका सुंदर घराची निर्मिती करण्यात आली आहे.
आर्किटेक्ट कैसुके कावागुचीनं या घराचं डिझाईन केलं आहे.
झाडांमध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेचा वापर करुन घर बांधण्यात आलं आहे.
निसर्गाला अजिबात धक्का न लावता केलेलं बांधकाम हे या घराचं वैशिष्ट्य.
निसर्गाच्या सहवासात, पण त्याला जराही धक्का न लावता वास्तव्य करण्याचा अनुभव याठिकाणी घेता येतो.