अवैध मसाज पार्लवर पोलिसांनी मारला छापा; अन् कमिश्नरला रंगेहात पडकडलं, मग घडलं असं काही.... By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 7:31 PM
1 / 7 हॉन्गकॉन्ग पोलिसांनी अलिकडेच एका अवैध मसाज पार्लरवर छापा मारला आहे. पण तिथं पोहोचल्यानंतर असं काही होईल याची कल्पनाही केली नव्हती. 2 / 7 हे मसाज पार्लर कोणत्याही लायसेंसशिवाय सुरू होतं. जेव्हा या ठिकाणी पोलिस पोहोचले तेव्हा अनपेक्षित प्रकार घडला. पोलिसांनी एका मुख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाहिलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले. 3 / 7 या ऑफिसरचे नाव फ्रेडरिक चोई चिन पेंग असे आहे. ही व्यक्ती सिनियर असिस्टेंट कमिश्नर या पदावर कार्यरत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार छापेमारीत पकडल्यानंतर त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. 4 / 7 या घटनेनंतर हॉन्गकॉन्ग पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेल्याचं सांगितलं जात आहे. २०१९ मध्ये हॉन्गकॉन्ग पोलिसांना टिकेचा सामना कराव लागला होता. 5 / 7 या प्रकरणात हॉन्गकॉन्ग पोलिसांचे प्रमुख टँग फ्रेडरिक यांना अटक केली जाणार आहे. 6 / 7 फ्रेंडरिक हे हॉन्गकॉन्ग पोलिसमधील सगळ्यात वरिष्ठ अधिकारी होते 7 / 7 फ्रेडरिक यांनी १९९५ मध्ये पोलिस फोर्स जॉईन केले होते. चीन, यूके, कनाडा, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशा देशांमध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतली होती. आणखी वाचा