शाळेत रेल्वे की रेल्वेत शाळा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 15:30 IST2019-05-07T15:26:38+5:302019-05-07T15:30:02+5:30

विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल ओढ निर्माण व्हावी यासाठी बिहारच्या समस्तीपूरमध्ये वर्गांच्या भिंती रेल्वे गाडीच्या रंगात रंगवण्यात आले आहेत.
शाळा प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची गोडी वाढली आहे.
शाळा रेल्वेप्रमाणे रंगवण्यात आल्यापासून विद्यार्थ्यांची शाळेतली हजेरी वाढली आहे.
शाळेला रेल्वेच्या रंगात रंगवल्यामुळे मतदानाचा टक्कादेखील वाढल्याचं दिसत आहे. छत्तीसगडच्या हजारीबागमध्ये हे दिसून आलं.
छत्तीसगडमध्ये काल (6 मे) मतदान झालं. शाळांचं पालटलेलं रुपडं पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. त्यामुळे या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढलेला दिसला.
राजस्थानच्या अलवरमध्येही एका माध्यमिक शाळेला रेल्वेच्या डब्यांप्रमाणे रंगवण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती लक्षणीय वाढली.
केरळच्या कासरगोड जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेच्या भिंतीदेखील रेल्वेच्या डब्यांप्रमाणे रंगवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे याच शाळेपासून देशातल्या शाळांना ही कल्पना सुचली.