बर्फाळ प्रदेशात नोकरीची संधी; पॅकेज पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 23:48 IST2019-12-20T23:44:30+5:302019-12-20T23:48:23+5:30

ऑस्ट्रेलियन सरकारनं अंटार्टिकामधील संशोधन केंद्रात काम करण्यासाठी भरती सुरू केली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना अंटार्टिका खंडात काम करण्याची संधी मिळेल.

ऑस्ट्रेलियन सरकारला अंटार्टिकामधील संशोधन केंद्रात काम करण्यासाठी १५० हून अधिक कर्मचारी हवे आहेत. यामध्ये डॉक्टर, आयटी ऑफिसर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांचा समावेश आहे.

अंटार्टिकामध्ये काम करणाऱ्या आयटी ऑफिसरला ५२ लाखांचं पॅकेज मिळेल. याठिकाणी काम करणाऱ्यांची मानसिक आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल.

अंटार्टिकामधील संशोधन केंद्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना १.४ कोटी रुपये वेतन मिळेल. याशिवाय वर्षाकाठी ४३ लाख रुपये भत्त्यांच्या स्वरुपात मिळतील.

अंटार्टिकामधील संशोधन केंद्रात काम करणाऱ्यांना अतिशय उत्तम सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. जेवण करण्यासाठी उत्कृष्ट आचारी असतील. याशिवाय १.८ कोटींचं पॅकेज देण्यात येईल.