शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ सनी लिओनीच नाही तर 'या' 10 पॉर्न स्टार्सही आहेत विवाहित, कशी आहे त्यांची फॅमिली?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 12:06 PM

1 / 12
अ‍ॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचे अनेक फायदे तर आहेतच, पण सोबतच काही नुकसानही आहेत. लोक अॅडल्ट फिल्म स्टार्सबाबत विचार करतात की, हे लोक आपल्या आयुष्यात कधी सेटल होत नसतील. खासकरून महिला. या लोकांचं प्रोफेशन असं आहे ज्यात त्यांचं लग्न होईल की नाही काही सांगता येत नाही. पण सत्य वेगळं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अ‍ॅडल्ट स्टार्सबाबत सांगणार आहोत ज्यांनी करिअर सोडून लग्न केलं आणि साधं जगणं जगत आहेत.
2 / 12
अनीका एल्बराइट - अनीका एल्बराइटने 2011 मध्ये अ‍ॅडल्ट इंडस्ट्री जॉइन केली होती. तिने मिक ब्लू आणि माइस्ट्रो क्लाउडीओसोबत मिळून एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं होतं. एल्बराइट ही बायसेक्शुअल आहे. तिने मिक ब्लूसोबत 2014 मध्ये लग्न केलं.
3 / 12
एसा अकीरा - एसा एक अ‍ॅडल्ट स्टार, डिरेक्टर आणि लेखिका आहे. तिने 19 व्या वयात Dominatrix म्हणून काम सुरू केलं होतं. त्यानंतर ती न्यूयॉर्कमध्ये स्ट्रीपरही होती. 2006 ते 2007 पर्यंत तिने लव स्पन्ज रेडिओ शोमध्ये काम केलं. यादरम्यान तिची भेट अॅडल्ट स्टार जीना लिनसोबत झाली. जीनानेच एसाला अॅडल्ट सिनेमात काम करण्याची ऑफर दिली होती. दोघांनी नंतर लग्न केलं.
4 / 12
एशिया करेरा - एशिया करेराचं करिअर 1993 ते 2003 पर्यंत सुरू होतं. तिने 400 अॅडल्ट व्हिडीओजमध्ये काम केलं. 1995 मध्ये एशियाने अॅडल्ट स्टार बड ली सोबत लग्न केलं. पण 2003 मध्ये त्यांचं घटस्फोट झाला. नंतर तिने लेखक डॉन लेमनसोबत लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत. मात्र, नंतर काही वर्षाने डॉनचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनंतर तिला एक मुलगा झाला होता. तो तिने दत्तक दिला होता.
5 / 12
बीबी जोन्स - बीबी जोन्स किंवा ब्रिटनी बेथ अमेरिकेतील आहे. तिचं खरं नाव ब्रिटनी मॅकलीन आहे. बीबीने एरिझोनामध्ये एक स्ट्रीपर म्हणून करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ती डिजिटल प्लेग्राउनचा भाग बनली होती. बीबीने जिम ग्रडीनासोबत लग्न केलं आणि आता ती 2 मुलांची आई झाली आहे.
6 / 12
जेना जेम्सन - जेना एक अमेरिकन बिझनेसवुमन, वेबकॅम मॉडल आणि अ‍ॅडल्ट फिल्म स्टार आहे. तिला पॉर्न इंडस्ट्रीची क्वीन म्हटलं जात होतं. ती इंडस्ट्रीतील सर्वात फेमस परफॉर्मर राहिली आहे. जेनाने अॅडल्ट स्टार आणि विकेड पिक्चर्सचा डायरेक्टर ब्रॅड आर्मस्ट्रॉंगसोबत लग्न केलं. पण त्यांचं हे लग्न केवळ 10 आठवडेच चाललं.
7 / 12
मिया मालकोवा - मियाला अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिची बेस्ट फ्रेन्ड नताशा मालकोवा घेऊन आली होती. मियानुसार नताशाला ती दुसऱ्या वर्गापासून ओळखत होती. मियाने तिचा जोडीदार स्टार डॅनी माउंटेनसोबत लग्न केलं. याची घोषणा तिने ट्विटरवरून केली होती.
8 / 12
सॅंडी वेस्टगेट - सॅंडी वेस्टगेटने प्लेबॉयच्य अनेक स्पेशल एडिशन व्हिडीओत काम केलं होतं. तिला 2001 मध्ये प्लेबॉय सायबर गर्ल ऑफ द वीकचा किताबही मिळाला होता. तिने जोश रायनसोबत लग्न केलं होतं. 2006 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
9 / 12
सनी लिओनी - सनी लिओनीबाबत काही माहीत नाही अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. सनी सध्या अॅडल्ट इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये काम करतीये. तिने अॅडल्ट स्टार डेनियल वेबरसोबत लग्न केलं. दोघांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी दत्तक घेतली आहे.
10 / 12
टेरा पॅट्रिक - अमेरिकेतील फेमस अ‍ॅडल्ट स्टार टेरा पॅट्रिकचं खरं नाव लिंडा एन हॉपकिन्स आहे. टेरा पॅट्रिकने जोडीदार अॅडल्ट स्टार इवान साइनफील्डसोबत लग्न केलं होतं. नंतर 2009 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ती हॉलिवूडचा स्पेशल इफेक्ट आर्टिस्ट टोनी अकॉसटासोबत रिलेशनमध्ये आहे. दोघांना एक मुलगी आहे.
11 / 12
टोरी ब्लॅक - एडल्ट स्टार टोरी ब्लॅकचं खरं नाव मिशेल चॅपमॅन आहे. 2010 मध्ये लोडेड मॅगझीनने तिला टोरी हे नाव दिलं होतं. टोरीने लिन्डेल अंडर्सनसोबत लग्न केलं होतं आणि ती दोन मुलांची आई आहे.
12 / 12
मिया खलीफा - मियाने केवळ 3 महिने अ‍ॅडल्ट सिनेमांमध्ये काम केलं. हे तिने 2015 मध्ये केलं होतं. त्यानंतर तिने अॅडल्ट इंडस्ट्री सोडली. 2020 मध्ये मियाने तिचा बॉयफ्रेन्ड रॉबर्ट सॅंडबर्गसोबत लग्न केलं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSunny Leoneसनी लिओनी