शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

800 वर्ष जुने असे रहस्यमय 11 चर्च, ज्यांच्या आख्यायिका आजही लोकांना करतात हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 12:37 PM

1 / 9
जगभरात अशा अनेक इमारती आणि ठिकाणं आहेत जी फार जुनी आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणांबाबत काहीना काही रहस्य जुळलेलं आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशा रहस्यमय चर्चबाबत सांगणार आहोत जे साधारण 800 वर्षे जुने आहेत. हे चर्च तयार होण्यामागे अनेक कारणे प्रचलित आहेत आणि ही कारणे वाचून कुणीही थक्क होईल. चला जाणून घेऊ काय आहे यांचं रहस्य....
2 / 9
हे चर्च लालिबेलाचे चर्च या नावाने ओळखले जातात.जे इथिओपियाच्या लालिबेला शहरात आहेत. इथे एकूण 11 असे चर्च आहेत जे डोंगर फोडून फारच सुंदरतेने तयार करण्यात आले आहेत.
3 / 9
असे म्हणतात की, लाल आणि नारंगी रंगाचे हे डोंगर ज्वालामुखी फुटल्यावर लाव्हारसापासून तयार झाले होते.
4 / 9
हा राजा जाग्वे राजवंशाचा होता. त्याच्या नावावरूनच या शहराला नाव देण्यात आलं आणि चर्चना सुद्धा त्याच्याच नावाने ओळखलं जातं. (Image Credit : tripadvisor.in)
5 / 9
असे म्हणतात की, राजा लालिबेला चर्च तयार करून या ठिकाणाला आफ्रिकेतील येरूशलेम करायचं होतं. येरूशलेम हे ख्रिस्ती धर्माचं एक प्रमुख पवित्र स्थळ आहे. या ठिकाणाला येशू ख्रिस्तांची कर्मभूमी मानली जाते. इथे 150 पेक्षा जास्त चर्च आहेत.
6 / 9
एका अंदाजानुसार, डोंगर फोडून हे चर्च तयार करायला साधारण 20 वर्षे लागले होते. हे डोंगर हातोडे आणि छन्नी सारख्या सामान्य हत्यारांनी तयार केले आहेत.
7 / 9
येथील सर्वात खास बाब म्हणजे एका चर्चला दुसऱ्या चर्चसोबत जोडण्यासाठी डोंगर फोडून भुयारी मार्गही तयार करण्यात आले आहेते.
8 / 9
इथे असलेल्या 11 चर्चमध्ये बेत अबा लिबानोस हे चर्च आपल्या वास्तुकलेसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. हे चर्च एका विशाल डोंगराला कापून तयार केलं आहे.
9 / 9
या चर्चच्या निर्माणाबाबत सांगितलं जातं की, हे चर्च स्वर्गातून आलेल्या देवदूतांनी तयार केलेत. लालिबेलातील लोकांमध्ये ही कथा प्रचलित आहे की, इथे मजूर काम करत होते आणि जेव्हा ते रात्री झोपत होते तेव्हा देवदूर येऊन येथील डोंगरांना चर्चचा आकार देत होते. 1978 मध्ये यूनेस्कोने हे चर्च वर्ल्ड हेरिटेज घोषित केले.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके