Photo : जेव्हा कुत्रा मालकाची दातांची कवळी घेऊन पळतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 12:55 IST2018-09-05T12:42:54+5:302018-09-05T12:55:17+5:30

कुत्री किती प्रमाणिक असतात हे सर्वांनाच माहीत आहे. ते तितकचे मस्तीखोर आणि खोडकर असतात हेही तुम्हीला माहीत असेल. या फोटोतील कुत्रा बघा किती क्यूट वाटतोय, पण हा कुत्रा दिसतो तितका क्यूट नाहीये. मॅगी नाव असलेल्या या कुत्र्याचा कारनामा सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे.

Eunice नावाच्या महिलेचा हा कुत्रा आहे. या महिलेचे वडील काही दिवसांपूर्वी आपली दातांची कवळी काढून बाजूला गेले. इतक्यात मॅगीने ते दात पळवले आणि ते त्याला अशाप्रकारे फिट बसले की, ते त्याचेच दात आहेत की काय असं दिसतंय. त्याचे या दातांसोबतचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.




















