प्रेरणादायी! पिझ्झा डिलिव्हरी बॉय झाला 6000 कोटींचा मालक; तुफान व्हायरल होतेय सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 12:40 PM2022-10-05T12:40:10+5:302022-10-05T12:46:45+5:30

Ben Francis: तरुण एकेकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचा पण आज त्याची एकूण संपत्ती तब्बल 6000 कोटींहून अधिक आहे.

जगभरात एका तरुण उद्योगपतीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचा ब्रँड केवळ अमेरिका आणि युरोपमध्येच नाही तर पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा तरुण एकेकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचा पण आज त्याची एकूण संपत्ती तब्बल 6000 कोटींहून अधिक आहे.

फोर्ब्सच्या यादीतही या तरुण उद्योगपतीचं नाव समाविष्ट झालं आहे. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणाऱ्या या उद्योगपतीचं नाव आहे बेन फ्रान्सिस. ज्याने वयाच्या 30 व्या वर्षी जे काही लाखो लोक 100 वर्षे आयुष्य घालवूनही करू शकले नाहीत ते करून दाखवलं आहे. बेन फ्रान्सिसची यशोगाथा जाणून घेऊया... (फोटो - सोशल मीडिया)

दिल्लीतील सरोजिनी नगर किंवा जनपथसारख्या युरोपातील बाजारपेठेत आपल्या वडिलांचे लहान कपड्यांचे दुकान थाटणाऱ्या बेन फ्रान्सिसच्या या चमत्काराला सर्व जग आता सलाम करत आहे. 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यूकेमध्ये राहणाऱ्या बेन फ्रान्सिसला जिमची खूप आवड होती. (फोटो - झी न्यूज)

फ्रान्सिसला त्याच्या आवडीचे जिमचे कपडे मिळत नव्हते. मग अचानक एके दिवशी त्याच्या मनात असा विचार आला की त्याने स्वतःचे कपडे स्वतः बनवायचे ठरवले. बेन तेव्हा बर्मिंगहॅम येथील एका विद्यापीठात शिकत होता आणि डिलिव्हरी बॉय म्हणून वस्तू पोहोचवण्याचे काम करून स्वतःचा खर्च भागवत होता. (फोटो - झी न्यूज)

जिममध्ये तासनतास वेळ घालवण्याची बेनची सवय आजही तशीच आहे, त्याने शून्यातून व्यवसाय सुरू केला होता. जिम करण्यासोबतच त्यांनी एका गॅरेजमध्ये स्वतःचे छोटे कपड्यांचे दुकान थाटले. जिथे तो त्याच्या आवडीचे कपडे विकायचा. सुरुवातीला त्याला त्याच्या डिझायनर कपड्यांचा खूप फायदा झाला. (फोटो - झी न्यूज)

आपल्या जिम वेअर व्यवसायाला त्याने जिमशार्क असे नाव दिले आणि एक छोटी कंपनी बनवली. इंटरनेटने तरुणांना दिलेल्या शक्तीचा वापर करून बेनने आपल्या छोट्या कंपनीला एक मोठा लोकप्रिय ब्रँड बनवला. जिमशार्कची सर्वत्रच चर्चा रंगली. फोर्ब्सच्या यादीत बेन फ्रान्सिसचे नावही सामील झाले आहे. (फोटो - सोशल मीडिया)

2012 मध्ये त्याने पालकांच्या गॅरेजमध्ये कपड्यांचे एक छोटेसे दुकान सुरू केले होते, आज तेच दुकान जगातील एक प्रसिद्ध ब्रँड बनले आहे. या ब्रँडच्या लोकप्रियतेने 5 वर्षात यशाचा नवा इतिहास रचला. आज, जिमशार्कचे मालक बेन फ्रान्सिस यांच्याकडे कंपनीत 70% पेक्षा जास्त हिस्सा आहे. (फोटो - झी न्यूज)

गेल्या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 700 दशलक्ष पौंड (6371 कोटी रुपये) होती. बेन लवकरच जुळ्या मुलांचा बाप होणार आहे. आज त्यांच्याकडे आलिशान वाहनांचा ताफा आहे. तो आपल्या राजेशाही जीवनातील छायाचित्रे आणि मोटिव्हेशन मंत्र सोशल मीडियावर शेअर करत असतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (फोटो - झी न्यूज)