'खतरों के खिलाडी', जगातील सर्वात धोकादायक स्विमिंग पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 20:02 IST2019-06-28T19:56:15+5:302019-06-28T20:02:13+5:30

साधारण आपण जमिनीवरील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेतो, पण हवेत लटकलेल्या स्विमिंग पूलमध्ये कधी आपण पोहायचा आनंद घेतला आहे का?. आज अशाच जगातील धोकादायक स्विमिंग पुलाची माहिती आपण घेऊया

इटलीच्या दक्षिण टायरोल प्रांतातील हा स्विमिंग पूल आहे. ह्यूबर्टस हॉटेलच्या वरील बाजुस हा पूल बांधण्यात आला आहे. 40 फूट उंचीवर हा स्विमिंग पूल असून 82 फूट लांब आहे.

या स्विमिंग पूलावर लावण्यात आलेल्या पारदर्शी काचेमुळे अतिशय सुंदर असून तितकाच धोकादायक आहे. म्हणून उत्कृष्ट स्वीमरही येथे पोहोताना काळजी घेतात.

या स्विमिंग पूलमध्ये काचेच्या फरश्या बसविण्यात आल्या आहेत. स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याचा आनंद घेताना पर्वतरांगांमध्ये भिरल्याचा भास होतो.

हॉटेल ह्यूबर्टंस येथील हा अद्भूत स्विमिंग पूल जगभरातील एक लक्षवेधी आहे. लोखंडाच्या चार मजबूत पायांवर हा स्विमिंग पूल टिकून आहे. या पुलावरुन खाली पाहिल्यास सुंदर निसर्गरम्य देखावा दिसतो.

इटलीतील हा पूल नक्कीच तुम्हाला आवडला असेल, संधी मिळाली तर या स्विमिंग पुलामध्ये पोहण्याचा आनंद आपण नक्कीच घेणार