जमिनीखाली कच्चं तेल नॅचरली तयार व्हायला किती वेळ लागतो? जाणून घ्या तेल तयार होण्याची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 14:16 IST2026-04-10T13:04:50+5:302026-04-10T14:16:37+5:30

Crude Oil Facts : पृथ्वीवरील नॅचरल तेल साठे संपले तर काय होईल? ते जमिनीखाली तयार व्हायला किती कालावधी लागतो? असेही अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

Crude Oil Facts : इराण, अमेरिका आणि इस्त्राइल यांच्यातील युद्धानंतर तेल आणि तेलांच्या विहिरींची चर्चा फारच सुरूये. जमिनीखाली दडलेले तेलाच्या भांडारांबाबत लोकांमध्ये अधिक उत्सुकता बघायला मिळत आहे. जमिनीखाली कच्चं तेल कसं तयार होतं, कुठे तयार होतं आणि काही मोजक्याच भागात जास्त का तयार होतं? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. सोबतच पृथ्वीवरील नॅचरल तेल साठे संपले तर काय होईल? ते जमिनीखाली तयार व्हायला किती कालावधी लागतो? असेही अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

हजारो फूट जमिनीखाली दडून असलेलं 'काळं सोनं' म्हणजेच कच्चं तेल काही एक दिवसात तयार होत नाही. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, आज आपण जे पेट्रोल किंवा डिझेल वापरतो, ते तयार होण्याची प्रक्रिया पृथ्वी मनुष्य नव्हतेच तेव्हा झाली होती. ही निसर्गाची एक अवघड आणि फार जास्त वेळ घेणारी अशी प्रक्रिया असते. ज्यात मृत समुद्री जीव आणि काही वनस्पती इंधनात रूपांतरित होतात.

आपल्याला विश्वास बसणार नाही की, कच्चं तेल जमिनीखाली तयार होण्यासाठी १० लाख ते १० कोटी वर्षांपर्यंतचा काळ लागू शकतो. जेव्हा समुद्रातील मृत सूक्ष्म जीव आणि मृत वनस्पती जमिनीखाली जमा होतात. तेव्हा त्यावर वाळू, मातीचा थर जमा होतो. हा थर वाढत जातो, नंतर यावर दबाव पडू तेल तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.

वैज्ञानिकांनुसार, जेव्हा तापमान ८० डिग्री सेल्सिअसच्या वर जातं, तेव्हा हा कार्बनिक कचरा हा हायड्रोकार्बनमध्ये बदलण्यास सुरूवात होते. हेच हायड्रोकार्बन नंतर कच्च्या तेलाचं रूप घेतं. जे नंतर रिफाइन करून वापरलं जातं.

जमिनीखाली कच्चं तेल तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी तापमानाचं संतुलन फार गरजेचं असतं. जर जमिनीखाली उष्णता एका लेव्हलनंतर जास्त वाढेल तर तेलाचं स्वरूप बदलतं. सामान्यपणे १०० ते १२० डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानावर कच्चं तेल सुरक्षित राहतं. पण तापमान वाढलं तर तेलाचं रूपांतर नॅचरल गॅस मध्ये होतं.

हेच कारण आहे की, जिथे तेलाचे भांडार आढळतात, तिथेच नॅचरल गॅस देखील मिळतो. म्हणजे यातून काय स्पष्ट होतं की, हे मनुष्यांद्वारे तयार करणं अशक्य आहे. ज्या वेगाने जगात तेल आणि गॅसचा वापर होतोय, त्या वेगाने निसर्ग तेल तयार करू शकत नाही. एकदा जर जमिनीखालील तेलाच्या विहिरी आटल्या तर त्या पुन्हा भरण्यासाठी कोट्यावधी वर्ष वाट बघावी लागेल.