शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ अंतर्वस्त्रांवर पारदर्शी पीपीई किट घालून हॉस्पिटलला गेली रशियन नर्स, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 2:50 PM

1 / 11
जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला असून बाधितांचा आकडा ५० लाखांच्या पुढे गेला आहे. जगभरातले डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत.
2 / 11
कोरोना रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांना, परिचारिकांना कोरोनाची लागण होत आहे. मात्र तरीही मोठ्या हिमतीनं वैद्यकीय कर्मचारी वर्ग कोरोना संकटाचा मुकाबला करत आहे.
3 / 11
पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र तरीही डॉक्टर परिस्थितीशी दोन हात करत आहेत.
4 / 11
कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या डॉक्टरांच्या, परिचारिकांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असताना रशियातल्या एका नर्सचे फोटो वेगळ्याच कारणामुळे व्हायरल झाले आहेत.
5 / 11
रशियातल्या एका परिचारिकेनं पीपीई खाली केवळ अंतर्वस्त्रं घातली होती. या परिचारिकेकडे एका वॉर्डची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या वॉर्डमध्ये सगळे पुरुष रुग्ण होते.
6 / 11
टुलामधील एका रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी परिचारिका आली असताना, रुग्णांपैकी कोणीतरी तिचा फोटो काढला. त्यानंतर तो अल्पावधीत व्हायरल झाला.
7 / 11
वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक गणवेश परिधान न केल्यानं संबंधित परिचारिकेवर रुग्णालय प्रमुखांनी कारवाई केली.
8 / 11
विशीतल्या नर्सला पीपीईखाली कपडे का घातले नाहीत, याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा पीपीईमध्ये उकाडा जाणवत असल्याचं तिनं सांगितलं.
9 / 11
कोरोना वॉर्डमधील रुणांच्या चाचणीसाठी परिधान केलेलं पीपीई इतकं पारदर्शक असेल, असं वाटलं नव्हतं, असंदेखील परिचारिकेनं टुला वैद्यकीय रग्णालयाच्या व्यवस्थापकांना सांगितलं.
10 / 11
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनानं संबंधित परिचारिकेवर कारवाई केली. मात्र या कारवाईची माहिती उपलब्ध झालेली नाही.
11 / 11
रशियामधील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या घरात असून मृतांचा आकडा तीन हजाराच्या पुढे गेला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या