शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Customers shaving with gold razor : नादच खुळा! पुण्यातल्या या सलूनमध्ये सोन्याच्या वस्तऱ्यानं केली जातेय दाढी; किंमत वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 2:32 PM

1 / 5
कोरोनानं अनेकांचा रोजगार हिरावून घेतला तर काहीजणांचे कामधंदे कायमचे ठप्प पडले. यादरम्यान अनेकांच्या अशा कहाण्या समोर आल्या.ज्यांनी संपूर्ण जगाला आशेचा किरण दाखवला आणि आपला व्यवसाय पुन्हा नव्यानं उभा केला. पुण्यातील देहूगावातील अविनाशा बोरुंदिया आणि विक्की वाघमारे यांची यशस्वी कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2 / 5
लॉकडाऊनमध्ये अनेक महिले दुकानं बंद असल्यामुळे विक्की आणि अविनाश यांचे सलूनसुद्धा बंद होतं. अनलॉकनंतर त्यांना सलून उघडण्याची परवानगी मिळाली, पण तरिही ग्राहकांचा प्रतिसाद जास्त नव्हता. म्हणून या दोघांनीही अशी शक्कल लढवली ज्यानंतर त्यांच्या दुकानात ग्राहकांची लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळाली. या सलूनमध्ये सोन्याच्या वस्तऱ्यानं लोकांची दाढी केली जात आहे.
3 / 5
अविनाश यांनी आजतकशी बोलताना सांगितले की, ''कोरोनामुळे आमच्या व्यवसायावर प्रचंड संकट ओढावलं होतं. त्यामुळे व्यवसाय बंद पडला होता. अनलॉकनंतर लोकांचा प्रतिसाद मिळेल असं वाटलं पण असं काहीही घडलं नाही. लोकांच्या मनात कोरोनाची भीती असल्यामुळे सलूनध्ये येण्याआधी खूप विचार करत होते. त्याचवेळी मी विचार केला की आपण काहीतरी वेगळं करायला हवं तरच ग्राहकांना आकर्षित करता येईल.'' मग अविनाश आणि विक्की यांनी रूबाब नावाचे नवीन सलून लॉन्च केले.
4 / 5
या दोघांनी अभ्यास करून माहिती मिळवली. त्यात असं दिसून आलं की, पुण्यातील लोकांना सोन्याच्या वस्तू खूप आवडतात. त्यानंतर त्यांनी एक शक्कल लढवली आणि सोन्याच्या वस्तऱ्यानं लोकांची दाढी करण्याचे ठरवले. ४ लाख चार रूपयांचे ८ तोळ्यांचे रेजर यांनी बनवून घेतले आहे. नंतर मागच्या दोन महिन्यात ग्राहकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पुण्यातील पिंपरीमधील सोनाराकडून विक्की आणि अविनाश वस्तरा बनवून घेण्यासाठी गेले पण त्यांचं म्हणणं कोणीही ऐकलं नाही. सगळ्यांनाच असंच वाटलं की हे दोघे मस्करी करत असावेत.
5 / 5
अविनाश आणि विक्की यांना पिंपरीमध्ये अखेर असा सोनार मिळाला ज्यांनी हा वस्तरा बनवण्यास होकार दिला. त्यानंतर दाढी करण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांची संख्याही वाढली. सोन्याच्या वस्तऱ्यानं दाढी करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला १०० रूपये मोजावे लागत आहेत. तर साध्या वस्तऱ्यानं दाढी करायची असेल तर ग्राहकाला ७० रूपये मोजावे लागतात. या सोन्याच्या वस्तऱ्यासाठी खास लॉकरची व्यवस्थासुद्धा केली आहे. येत्या काही दिवसात दोन किंवा तीन वस्तरे बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेPuneपुणे