बोंबला! चीनने डासांपासून देशात पसरवली नवीन महामारी, लोक झालेे हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 01:23 PM2020-09-16T13:23:43+5:302020-09-16T13:31:05+5:30

चीनने एक्सपरिमेंटच्या नावावर चेंगडु कियी सिटी फॉरेस्ट गार्डन नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला होता.

आज ग्लोबल वॉर्मिंगपासून ते ओझोन लेअरपर्यंतच्या अनेक समस्या लोकांसमोर आहेत. सगळेच पर्यावरणाचं संतुलन ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी होती की, बर्फ वेगाने वितळतो आहे. त्यामुळे काही देश चिंतेत आहेत. पर्यावरण संतुलनासाठी चीनने सुद्धा बरेच प्रयत्न केले. यातील त्यांच्या एका प्रयत्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. चीनने एक्सपरिमेंटच्या नावावर चेंगडु कियी सिटी फॉरेस्ट गार्डन नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केला होता. यात सरकारने घरांमध्ये झाडे लावण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांनी याच्या दुष्परिणामांवर चर्चाच केली नाही. आता या घरांमध्ये कुणीच राहत नाही. कारण या झाडांमुळे पसरलेले डास.

चीनने चेंगडुमध्ये कियी सिटी फॉरेस्ट गार्डन नावाने रेसिडेंशिअल बिल्डींग कॉम्प्लेक्स तयार केलं होतं. याच्या एरिअल व्ह्यूवरून कळतं की, इथे कशाप्रकारे प्रत्येक अपार्टमेंटमध्ये झाडांना जागा दिली.

या प्रोजेक्टची सुरूवात २०१८ मध्ये केली होती. याच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये प्रायव्हेट बाल्कनी होती. ज्यात झाडे लावण्यात आली होती. हे शहर पर्यावरणाचं संतुलन ठेवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलं होतं.

रिपोर्ट्सनुसार, एप्रिल २०२० मध्ये या कॉम्प्लेक्समध्ये तयार सर्वच ८२६ अपार्टमेंट विकले गेले होते. पण तरीही लोक नंतर ही घरे सोडून गेलीत. आज इथे कुणीच राहत नाही.

हा प्रोजेक्ट चांगला होता आणि उद्देशही चांगला होता. पण हा प्रोजेक्ट तयार करताना एक चूक झाली. ज्यामुळे हा प्रोजेक्ट फेल झाला.

सुरूवातीला झाडांमुळे लोकांना चांगलं वाटत होतं. पण नंतर इथे डासांनी थैमान घातलं. लोकांनी झाडे आणि बाल्कनीत जाळ्या लावून डासांपासून सुरक्षा करण्याचा प्रयत्न केला. पण डासांची संख्या इतकी झाली की, इथे आजार पसरू लागले.

आता इथे कुणीच राहत नाही. आता लोकही राहत नसल्याने डासांचं ब्रीडिंग फार वाढलं आहे. इथे घर खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये सध्या फार रोष आहे. आता इथे ८२६ अपार्टमेंटपैकी केवळ १० मध्ये लोक राहतात. ते सांगतात की, डासांमध्ये इथे जगणं कठिण आहे.