शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनने पृथ्वीवर आणलं अंतराळात पेरलेले तांदळांच बियाणं, 'स्पेस राईस'म्हणून फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 9:47 PM

1 / 10
चीनने अंतराळात तांदुळ पेरल्याचा दावा केला आहे. हे धान्य अंतरळात उगवलं आहे.
2 / 10
अंतराळातून आलेल्या या तांदुळाच्या दाण्यांना चीनने स्पेस राईस असं नाव दिलं आहे.
3 / 10
रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपल्या चांद्रयानसह चीननं भात बियाणं अवकाशात पाठविलं होतं.
4 / 10
त्यानंतर आता अंतराळ यानातून १५०० तांदळाचे दाणे पृथ्वीवर आणण्यात आले आहेत. त्यांचं वजन ४० ग्रॅम इतकं आहे.
5 / 10
स्पेस राइसच्या बियाण्याची लांबी सुमारे १ सेंटीमीटर एवढी आहे. चीन चंद्रावर संशोधन केंद्रही सुरू करण्याची योजना करत आहे.
6 / 10
चीन १९८७ पासून तांदूळ आणि इतर पिकांचे बियाणे अवकाशात पाठवत आहे.
7 / 10
अंतरळातून आणलेलं हे धान्य आता हे दक्षिण चीन कृषी विद्यापीठ परिसरामध्ये पेरले जाईल.
8 / 10
हे चीनने अंतराळात उगवलेलं पहिलं प्रायोगिक धान्य आहे. आता ते बियाण्याच्या स्वरूपात या देशानं पृथ्वीवर आणलं आहे.
9 / 10
काही काळ अंतराळाच्या निर्वात वातावरणात राहिल्यानंतर बियाण्यामध्ये बरेच बदल होतात. त्यांना जमिनीत पेरल्यास जास्त उत्पन्न मिळतं, असा चीनचा दावा आहे.
10 / 10
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार चीनने आतापर्यंत कापूस ते टोमॅटोपर्यंत असे २०० हून अधिक पिकांवर प्रयोग केले आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके