मुंबई नाही' हे' आहे देशातील जास्त गर्दीचं रेल्वे स्टेशन, रोज 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी; 600 रेल्वेची ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:49 IST2025-08-22T15:42:51+5:302025-08-22T15:49:24+5:30

Busiest Railway Station : सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटेल की, मुंबईतील सीएसएमटी स्टेशन जास्त गर्दीचं असेल. पण असं नाहीये.

Busiest Railway Station : भारतात रेल्वे केवळ प्रवासाचं साधन नाही तर लोकांची एक लाइफलाईन आहे. ज्याद्वारे रोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करतात. भारतातील रेल्वे सेवा ही जगातील सगळ्यात मोठ्या सेवांपैकी एक आहे.

देशात अनेक मोठी रेल्वे स्टेशन्स आहेत. पण यातील एक असं रेल्वे स्टेशन आहे, जेथून सगळ्यात जास्त लोक प्रवास करतात. आता सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटेल की, मुंबईतील सीएसएमटी स्टेशन जास्त गर्दीचं असेल. पण असं नाहीये.

भारतात सगळ्यात जास्त वर्दळीचं रेल्वे स्टेशन हे मुंबई किंवा दिल्लीतील नसून कोलकात्याजवळील एक स्टेशन आहे. ज्याचं नाव आहे हावडा जंक्शन.

एका आकडेवारीनुसार येथून दर दिवसाला 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. या स्टेशनवर एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळेच हे स्टेशन देशातील सगळ्यात मोठं आणि बिझी स्टेशन आहे.

हावडा स्टेशनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे याचं लोकेशन. हे स्टेशन हावडा ब्रिजद्वारे थेट कोलकातासोबत जुळलेलं आहे. या स्टेशनसोबत बिहार, झारखंड, ओडीशा आणि आसामचे मार्ग जुळलेले आहेत.

हावडा जंक्शनचा इतिहासही खूप खास आहे. हे स्टेशन 1854 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे भारतातील सगळ्यात जुन्या आणि ऐतिहासिक स्टेशनांपैकी हे एक स्टेशन आहे.

इंग्रज असताना आणि ते निघून गेल्यावरही हे स्टेशन देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पुढे नेण्यास मदत करत होतं. हावडा स्टेशन हे केवळ एक रेल्वे स्टेशन नाही. हे एक शहर आहे. ज्यासोबत अनेक कथा जुळलेल्या आहेत. त्यामुळे हे केवळ भारतच नाही तर जगातील सगळ्यात वेगळ्या बिझी स्टेशनांमध्ये मोजलं जातं.