ना कार, ना हॅलिकॅप्टर, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी वधु आली बैलगाडीतून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 18:40 IST
1 / 6मध्यप्रदेशच्या नेपानगरमध्ये राहणाऱ्या भगवत चौहान यांनी लेकीला सासरहून माहेरी आणताना पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला आहे. आपल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी ते बैलगाडीतून पोहोचले. बैलगाडी उत्तमरित्या सजवण्यात आली होती.2 / 6भागवत चौहान यांची कन्या पूजा चौहानचं दोनच दिवसांपूर्वी शुभम पाटणकर यांच्याशी लग्न झालं होतं. चव्हाण परिवारानं लेकीला घरी आणण्यासाठी सजवलेली बैलगाडी पाठवली आणि त्यात बसवून पूजा माहेरी आणलं.3 / 6बैलगाडीचा वापर सध्या केवळ शेतीच्या कामासाठी आणि शेतात जाण्यासाठीच होताना दिसतो. कधीकधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करताना विरोधी पक्ष त्याचा वापर करतात. मात्र लग्नाचा आणि बैलगाडीचा संबंध आताशा येताना दिसत नाही.4 / 6पूजाच्या सासरच्या मंडळीना ही अनोखी कल्पना पाहून आनंद झाला. त्यांनी जोरदार स्वागत केलं आणि सुनेला त्यांच्यासोबत माहेरी पाठवलं. सर्वांनी बैलगाडीसोबत एकत्र फोटोदेखील काढला.5 / 6चौहानांप्रमाणे जर सर्वांनी बैलगाडीचा उपयोग केला, तर पर्यावरण रक्षणासाठी त्याचा मोठा उपयोग होईल आणि पेट्रोल डिझेलवर होणाऱ्या खर्चातही बचत होईल, असं मत व्यक्त करण्यात येत आहे.6 / 6भागवत चौहान आनंदानं आपल्या लेकीला घेऊन घरी रवाना झाले. सर्वांनी आनंदानं त्यांना निरोप दिला.