फुग्यावरुन कल्पना सुचली अन् विद्यार्थ्यानं तयार केली हवेवर चालणारी दुचाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:19 PM2019-12-05T16:19:18+5:302019-12-05T16:22:31+5:30

उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलानं हवेवर चालणारी दुचाकी तयार केली आहे.

हवा भरलेला फुगा हातातून सुटल्यानंतर तो काही वेळ हवेमुळे पुढे सरकला. त्यावरुन अद्वैत छेत्रीला हवेवर चालणाऱ्या दुचाकीची कल्पना सुचली.

हवेवर चालणाऱ्या दुचाकीमुळे प्रदूषण कमी होईल असा विश्वास अद्वैतनं व्यक्त केला.

अद्वैतनं हवेवर चालणारी दुचाकी पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित केली आहे.

अद्वैतनं त्याच्या नव्या दुचाकीला अद्वैत ओ टू असं नाव दिलं आहे.