शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बोंबला! एका व्हिडीओ जोकमुळे मोडलं होतं लग्न, 108 वेळा ‘मैं जोरू का गुलाम बनकर रहूंगा’ लिहिल्यावरच झाली 'ती' तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 1:30 PM

1 / 9
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका फॅमिली कोर्टात एक अशी घटना घडली जी वाचून तुम्ही केवळ हैराण व्हाल असं नाही तर कपाळावरही हात मारून घ्याल. इथे एका जोकमुळे जुळलेलं लग्न मोडलं. जोकमुळे वाद इतका वाढला होता की, साखरपुडाच मोडला आणि 20 मे रोजी होणारं लग्नही कॅन्सल झालं.
2 / 9
दोन्ही परिवारातील लोकांना जेव्हा साखरपुडा मोडण्याचं कारण समजलं तर दोन्ही परिवारातील लोक हैराण झाले. हा साखरपुडा मोडणारी मुलगी मात्र अडून बसली होती. ती माघार घ्यायला तयार नव्हती. त्यानंतर हे प्रकरण फॅमिली कोर्टात गेलं. तिथे 'मै जोरू का गुलाम हूं' लिहिल्यांवरच हे प्रकरण निवळलं. (सांकेतिक छायाचित्र)
3 / 9
एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, साखरपुड्यानंतर मुलीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला एक व्हिडीओ जोक पाठवला. व्हिडीओत पती भांडी घासत आहे आणि पत्नीच्या इशाऱ्यांवर नाचत आहे.
4 / 9
सोबत तिने लिहिले की, लग्नानंतर तुलाही असंच करावं लागणार आहे. व्हिडीओ पाहून मुलाने उत्तर दिलं की, मी त्या कॅटेगरीत नाही बसत. अशा लोकांची वेगळी कॅटेगरी असते.
5 / 9
आता होणाऱ्या नवऱ्याने दिलेलं हे थेट उत्तर वाचून मुलगी चांगलीच संतापली. दोघांमध्ये फोनवर जरा बाचाबाचीही झाली आणि मुलीने साखरपुडा मोडला. दोघांचं लग्न 20 मे रोजी होणार होतं. हे लग्न 15 जानेवारीला ठरलं होतं आणि 2 मेपर्यत दोघांमध्ये बोलणं सुरू होतं.
6 / 9
जेव्हा मुलाच्या घरातील लोकांना याबाबत माहिती मिळाली तर ते हैराण झाले. नंतर मुलीला मनवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण ती काही मानायला तयार नव्हती. त्यानंतर परिवारातील लोक फॅमिली कोर्टात गेले. (Image Credit : additudemag.com)(सांकेतिक छायाचित्र)
7 / 9
कोर्टात काउन्सिलिंग केलं गेलं आणि मुलगी लग्न करण्यास तयार झाली. इथे मुलगा म्हणला की, इतक्या छोट्या गोष्टीचा तिला राग येईल याची त्याला कल्पना नव्हती. मुलाने सर्वांसमोर तिची माफी मागितली. (Image Credit : madamenoire.com) (सांकेतिक छायाचित्र)
8 / 9
मुलाने सर्वांसमोर केवळ माफीच मागितली नाही तर तो तिला म्हणाला की, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तसेच त्याने 108 वेळा लिहिले की, 'मैं जोरू का गुलाम बनकर रहूंगा'. तेव्हा कुठे दोघांमधील वाद मिटला. आता 10 जून रोजी दोघांचं लग्न आहे.
9 / 9
दरम्यान, फॅमिली कोर्टच्या काउन्सेलरने वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मुलगा आणि मुलगी दोघेही मुंबईत एका खाजगी कंपनीत एक्झिक्युटीव्ह पदावर काम करतात. दोघांची लागोपाठ 4 वेळा काउन्सेलिंग केलं गेलं. आता दोघांमधील वाद मिटला आहे. (सांकेतिक छायाचित्र)
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्न