कर्माचं फळ! बॉयफ्रेन्डच्या घरासमोर गर्लफ्रेन्डचा हाय होल्टेज ड्रामा, चक्क अर्ध्या रात्री लावून दिलं दोघांचं लग्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 14:19 IST
1 / 10उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका प्रेयसी प्रियकराच्या घरासमोर धरणं देऊन बसली आहे. तिने इथे चांगलाच गोंधळ घातला. 2 / 10त्यामुळे घाबरून प्रियकर आणि त्याच्या घरातील लोक घराला लॉक लावून पळून गेले. पण प्रेयसी काही तिथून हलली नाही. रात्री जेव्हा प्रियकर आणि घरातील लोक परत आले. 3 / 10तेव्हा लोकांनी समजावल्यावर आणि पोलिसांनी कारवाई होईल हे सांगितल्यावर मुलाच्या घरातील लोक तयार झाले. आणि दोघांचं लग्न लावण्यात आलं4 / 10बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील एक २५ वर्षीय तरूणी तिच्या मोठ्या बहिणीकडे शीशगढ गावात आली होती. इथेच शेजारच्या गावातील तरूणासोबत तिची भेट झाली. तो शीशगढला त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. 5 / 10मात्र, प्रियकराने प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण केलं. तो तिला घरी घेऊन गेला. काही दिवस तिच्यासोबत राहिला. 6 / 10त्यानंतर तरूणीला हरयाणाला नातेवाईकांकडे घेऊन गेला होता. काही दिवस तिथे राहिल्यानंतर त्याने तिला पुन्हा बहिणीकडे नेऊन सोडलं. त्याने निकाह करण्यास नकार दिला.7 / 10त्याने तरूणीसोबत बोलणं बंद केलं. तरूणी जेव्हा त्याला फोन करत होती तेव्हा तो तिला जीवे मारण्याची धकमी देत होता. यानंतर तरूणीने पोलिसात तक्रार दिली. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. 8 / 10यानंतर गेल्या सोमवारी प्रेयसी त्याच्या घरी गेली आणि त्याच्या दरवाज्यासमोर धरणं देऊन बसली. तिने गोंधळही घातला. हे बघून घाबरून प्रियकर आणि घरातील लोक फरार झाले. तरूणीने ११२ वर फोन केला तर पोलिसांनी तिलाच घरी जाण्यासाठी दबाव टाकला.9 / 10मात्र, तरूणी लग्नाच्या मागणीवर अडून बसली होती. पोलिसही तिथेच होते. रात्री साधारण दीड वाजता गावातील लोक तिथे जमले. यादरम्यान तरूणीचा प्रियकर आणि घरातील लोक घरी परतले. पण ते तरूणीला पाहून पुन्हा पळू लागले होते. 10 / 10अशात गावकऱ्यांना त्यांना पकडले आणि समजावले. भरपूर समजावल्यानंतर प्रियकर आणि त्याच्या परिवारातील लोक त्यांचं लग्न लावून देण्यासाठी तयार झाले. रात्रीच मौलवींना बोलवण्यात आलं आणि तरूणी मोठ्या बहिणीकडे सर्व गेले आणि तिथे त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. आणि रात्रीच नवरीला सार करण्यात आलं. सध्या परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे.