आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने असं सजवा घर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:30 PM2020-01-27T12:30:39+5:302020-01-27T14:00:02+5:30

घर सुंदर दिसावं यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. आकर्षक आणि हटके पद्धतीने घर सजवण्याकडे अधिक कल असतो. आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने घर सुंदररित्या सजवता येतं.

सध्या आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या सजावटीचा ट्रेंड आहे. खोट्या फुलांचे दोन फायदे आहे. एक तर ही फुलं कोमेजून जात नाही आणि दुसरं म्हणजे वेळोवेळी ती स्वच्छ करता येतात.

बाजारात विविध रंगाची, आकाराची सुंदर फुलं उपलब्ध असतात. त्यामुळे घरातील रंगसंगतीप्रमाणे तसेच इंटिरिअरप्रमाणे हवी तशी फुलं निवडता येतात.

आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने हटके पद्धतीने घर सजवता येतं.

घराच्या बाल्कनीमध्ये अशा पद्धतीने फुलांचं डेकोरेशन करता येतं.

घराच्या भिंतींवर हँगिंग बास्केटच्या मदतीने सजावट करा.

घरामध्ये अथवा खिडकीजवळ सजावटीसाठी फ्लॉवर शो-पीसची मदत घेता येईल.

गार्डन एरियाला आर्टिफिशिअल फ्लॉवर्सच्या मदतीने सुंदर लूक देता येतो.