बम बम भोले! नदी किनारी वाळूमध्ये सुरू होतो खोदकाम, शेकडो वर्ष जुनं शिव मंदिर सापडलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:12 AM2020-06-18T11:12:22+5:302020-06-18T12:07:33+5:30

लॉकडाऊन दरम्यान अनेक आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहेत. या आश्चर्यकारक घटनांमध्ये आणखी एक घटनेची भर पडली आहे.

आंध्रप्रदेशातील एका नदी किनारी वाळूमध्ये खोदकाम सुरू होतं. हे खोदकाम सुरू असताना असं काही समोर आलं की, लोक ते बघून अवाक् झाले.

खोदकाम करताना वाळूमध्ये एक विशाल मंदिर असल्याचं समोर आलं. हे मंदिर अनेक वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जात आहे.

हे मंदिर आंध्र प्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील मंगळवारी लोकांसमोर आलं. नेल्लोर जिल्ह्याच्या पेरूमल्लपाडु गावातील पेन्ना नदी किनारी वाळूचं खोदकाम सुरू होतं. तिथे हे मंदिर आश्चर्यकारकपणे समोर आलं आहे.

एएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, हे एक शिव मंदिर आहे. काही स्थानिकांनी हे मंदिर 200 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं. तर काही लोक हे मंदिर त्याहून अधिक जुनं असल्याचं सांगितलं.

मीडिया रिपोर्टनुसार, या मंदिराची बनावट ऐतिहासिक नागेश्वर स्वामी मंदिरासारखी आहे. असे मानले जाते की, हे मंदिर भगवान परशुरामाने तयार केलं होतं.

दरम्यान, 600 वर्षांपूर्वी 60 फूट उंच मंदिर निर्माण केल्याचा उल्लेखही असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, 600 वर्षांपूर्वी 60 फूट उंच मंदिर निर्माण केल्याचा उल्लेखही असल्याचं एका अधिकाऱ्यांनी सांगितले.