पाकिस्तानमधल्या पत्रकाराचं भन्नाट रिपोर्टिंग; फोटो पाहून खो-खो हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 23:01 IST2020-01-20T22:58:03+5:302020-01-20T23:01:39+5:30

काही पत्रकार त्यांच्या हटके रिपोर्टिंगमुळे चर्चेत येतात. पाकिस्तानमध्ये अशा पत्रकारांची कमतरता नाही. सध्या जिओ न्यूजचे पत्रकार अमीन हफिज यांची जोरदार चर्चा आहे.
एका जुन्या महालाजवळ रिपोर्टिंग करताना हफिज शहेनशाह बनले होते.
हफिज यांच्या रिपोर्टिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हफिज अनेकदा त्यांच्या रिपोर्टिंगमुळे वादातदेखील सापडले आहेत.
डिसेंबर २०१८ मध्ये गाढवांशी संबंधित व्यापार वाढल्याची बातमी करताना हफिज गाढवावर बसले होते.
पाकिस्तान सुपर लीगबद्दल रिपोर्टिंग करताना हफिज तिकीटासाठी रांगेत उभे राहिले होते. त्यावेळी ५०० रुपयांची तिकीटं संपल्यामुळे हफिज यांनी क्रिकेट चाहत्यांसोबत घोषणाबाजी केली होती.
पावसाचं रिपोर्टिंग करताना अनेकदा पत्रकार छत्री घेतात. मात्र हफिज पावसात भिजता भिजता रिपोर्टिंग करतात.
म्हैशींना चारा कमी पडू लागला होता, त्यावेळा हफिज यांनी म्हैशींची मुलाखत घेतली होती.