प्राण्यांची मुंडकी, हाडं, अवयव विकणे आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 22:31 IST2019-10-22T22:19:53+5:302019-10-22T22:31:28+5:30

दक्षिण आफ्रिकेतील टोगो देशातील एका शहरात प्राण्यांच्या हाडांचा बाजार भरतो.
या ठिकाणी विविध प्राण्यांच्या शरीरांचे अवयव विक्रीस ठेवलेले असतात.
माकडांची तोडं, मगरीचं डोकं, सांबरशिंग अशा वस्तूंनी टोगोतील अकोडेस्सेवाचा बाजार कायम भरलेला असतो.
माणसाच्या शरीरावरील जखमा या गोष्टींच्या मदतीनं बऱ्या होतात असा स्थानिकांचा दावा आहे.
प्राण्यांचे अवयव औषधी वनस्पतींसोबत गरम करून त्यापासून तयार होणारी पावडर जखमा बऱ्या करण्यापासून वापरली जाते.
थोडक्यात काय, तर हा बाजार स्थानिकांसाठी औषधालयं आहे.
वर्षाचे बाराही महिने या बाजारात मांत्रिकांची गर्दी असते.