72 years old bodybuilder : तरूणांनाही लाजवतील असे आहेत ७२ वर्षीय बॉडीबिल्डर आजोबा; यांच्या फिटनेसचं सिक्रेट आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:44 AM2021-03-31T11:44:52+5:302021-03-31T11:56:21+5:30

72 years old bodybuilder : त्यांना सात मुलं आणि पाच नातवंडं आहेत. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना बॉडी बिल्डींगचा दांडगा अनुभव असल्याचं दिसून येतं.

आकर्षक शरीरयष्टी कोणाला नको असते?. पण खूप कमी लोक अशा शरीरयष्टीसाठी स्वतःवर मेहनत घेणारे असतात. अनेकजण बॉडी बनवण्याासाठी व्यायाम करतात तर कोणी वेगवेगळ्या उत्पादनांचे सेवन करतं. खूप कमी लोक असे असतात जे तरूण वयापासून व्यायामाला सुरूवात करतात आणि शेवटपर्यंत आपल्या शरीराला मेंटेन ठेवतात. अशाच एका आजोबांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Image Credit- AFP)

तुमचा विश्वास बसणार नाही पण हे आजोबा ७२ वर्षांचे असून मलेशियाचे रहिवासी आहेत. मलेशियन बॉडीबिल्डर ए. अरोकियासामी (A. Arokiasamy) या वयातही आपल्या व्यायामशाळेत दररोज वेटलिफ्टिंग (Weightlifting) करणं चुकवत नाहीत.

अत्यंत व्यस्त जीवनशैलीत त्यांनी हेल्दी (Healthy) राहणं त्यांनी पसंत केलं. कोरोना व्हायरसशी लढण्याचा हा सोपा मार्ग आहे. अरोकियासामी हे मूळचे भारतीय वंशाचे असून, तिथल्या अल्पसंख्याकांत त्यांचा समावेश होतो. शाळा सोडल्यानंतर अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डिंग (Bodybuilding) करायचं ठरवंल.

विशेष म्हणजे मिस्टर युनिव्हर्स (Mr. Universe) या स्पर्धेत त्यांनी मलेशियाचं अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं होतं. १९८१ मध्ये फिलिपाइन्समध्ये झालेल्या आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं.

मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेचा माजी विजेता आणि हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger) हा अरोकियासामींचा आदर्श आहे.

कालांतराने अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डर होऊ इच्छिणाऱ्यांना वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यासाठी स्वतःची व्यायामशाळाही उघडली. त्याच्या व्यायामशाळेत नेहमीच पुरूषांची गर्दी असते. यासाठी ते फक्त एक डॉलर एवढं शुल्क घेतात.

एएफपीलाशी बोलताना अरोकियासामी यांनी सांगितले की, ''वेटलिफ्टिंग, व्यायामामुळे लवकर म्हातारेपणा येत नाही. त्यामुळे तुम्ही हेल्दी राहता.'' त्यांना सात मुलं आणि पाच नातवंडं आहेत. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना बॉडी बिल्डींगचा दांडगा अनुभव असल्याचं दिसून येतं.

सहसा पाहिलं जातं बॉडी बिल्डींगपासून वयस्कर लोक खूप लांब राहतात. संशोधनानुसार ज्यांना ते करण्याची सवय आहे आणि ज्या व्यक्ती ते सुरू ठेवतात, त्याचे आरोग्याला त्याचे चांगले फायदे होतात.

अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार 65 वर्षांवरील ज्या व्यक्ती आठवड्यातून किमान दोनदा तरी चांगला व्यायाम करतात, त्यांच्या आयुष्याचा कालावधी बऱ्यापैकी वाढला. (Image Credit- AFP))