बापरे! 'या' फणसाचं वजन पाहून तुम्हीही व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:32 PM2020-05-15T13:32:55+5:302020-05-15T14:52:32+5:30

केरळमधील एका व्यक्तीने त्याच्या घराच्या परसात असलेल्या फणसाच्या झाडाला जगातील सर्वात वजनदार फणस लागल्याचा दावा केला आहे.

या फणसाचे वजन ५१.४ किलो असल्याचे सांगण्यात येते. तसेच, या फणसाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यासाठी तयारीही सुरु केली आहे.

या फणसाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असून फक्त या फणसाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. फोटो शेअर करत अनेक जण विविध प्रतिक्रिया देत आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, परसबागेत आलेला जगातील सर्वाधिक वजनदार म्हणजचे ४२.७२ किलोचा फणस पुण्यात सापडल्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

मात्र, आमच्या परसात ५१.४ किलो वजनाचा फणस आढल्यामुळे आम्ही याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणार आहोत, असे या शेतकरी कुटुंबातील सदस्य जॉन कुट्टी यांनी सांगितले.

या फणसाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असून फक्त या फणसाचीच सर्वत्र चर्चा होत आहे. फोटो शेअर करत अनेक जण विविध प्रतिक्रिया देत आहेत.

तसेच, सोशल मीडियातील अनेक मंडळी जॉन कुट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांना या फणसाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

आता पुण्यातील फसणाचा आधीचा रेकॉर्ड हा केरळमधील फणस मोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीम आल्यानंतर हे सिद्ध होणार आहे.

दरम्यान, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगभरातील विविध विक्रमांची नोंद केली जाते. यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची टीम प्रत्यक्ष पाहणी करते. त्यानंतर टीम नवा रेकॉर्ड आहे का, याची पडताळणी करते आणि संबंधित विक्रम सिद्ध झाल्यास त्यासंबंधी व्यक्तीला प्रमाणपत्र दिले जाते.