शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

26 वर्षांआधी एकाने डोक्यात मारला होता चाकू; डॉक्टरांनी आता काढला, फोटो पाहून व्हाल थक्क...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 3:13 PM

1 / 8
सध्या जगभरात सगळीकडेच चीनची जरा जास्तच चर्चा होत आहे. कारण याच चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे.
2 / 8
दरम्यान चीनमधूनच एक आश्चर्यजनक आणि विचित्र घटना समोर आली आहे. येथील केशेडोंग प्रांतातील एका व्यक्तीच्या डोक्यातून तब्बल 26 वर्षांनी चाकू काढण्यात आलाय.
3 / 8
इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचं नाव डूयोरीजी आहे. त्याचं वय 76 असून तो व्यवसायाने शेतकरी आहे. 1990 मधील घटना आहे. एका व्यक्तीने डूयोरीजीवर चाकूने हल्ला केला होता. चाकू डोक्यावर लागला होता, तेव्हापासून चाकू डोक्यातच होता.
4 / 8
त्यांनी हा चाकू डोक्यातून काढण्याचा प्रयत्न अनेकदा केला. पण त्यांना त्यात काही यश आलं नाही. इतक्या वर्षांनी त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं. इतक्या वर्षापासून त्यांच्या डोक्यात अडकलेला चाकू काढण्यात आलाय.
5 / 8
दोन तासांच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यातून 4 इंच लांब चाकू डोक्यातून काढला. डॉक्टरांनी सांगितले की, हे ऑपरेशन दोन भागात करण्यात आलं.
6 / 8
याआधी एक ऑपरेशन 2 एप्रिलला करण्यात आलं होतं. तर दुसरं 8 तारखेला केलं. डॉक्टरांनी याला चमत्कार म्हटलं आहे. कारण इतके वर्ष चाकू डोक्यात असून ते जिवंत होते. डॉक्टरांनी डोक्यात अडकलेल्या चाकूच फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.
7 / 8
शेडोंग क्वानफोशान हॉस्पिटलने हे ऑपरेशन केलंय. मुख्य न्यूरोसर्जन लियू गुआंगकुन यांच्यानुसार, डूयोरीजीचा त्रास दूर करण्याचा एकमेव उपाय म्हणजे त्यांच्या डोक्यातून चाकू काढणे हाच होता. (Image Credit : dailystar.co.uk)
8 / 8
डूयोरीजी यांनी एकदा 2012 मध्ये डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. त्यावेळी त्यांना डोकेदुखी आणि एक डोळ्याची समस्या झाली होती. पण त्यावेळी चाकू काढला आला नाही. आता त्यांची स्थिती ठिक आहे. (Image Credit : dailystar.co.uk)
टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके