शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वप्न तर रोजच पाहत असाल; पण स्वप्नांबाबतच्या 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 3:43 PM

1 / 11
झोपल्यावर आपल्यापैकी प्रत्येकजणचं स्वप्न पाहतो. जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर आम्ही सांगतो तुमचा हा समज चुकीचा आहे. खरं तर प्रत्येक व्यक्तीला झोपल्यावर स्वप्न पडेल असं काही नाही. कदाचित हे एखाद्या आजाराचंही कारण असू शकतं. हे ऐकून धक्का बसला ना? फक्त ही एकच गोष्ट नाही तर स्वप्नाबाबत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्वप्नांबाबत काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत, ज्या गोष्टींचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल... (Image Credit : ISRAEL21c)
2 / 11
1. झोपेतून जागं झाल्यानंतर 5 मिनिटांनी आपण अर्धं स्वप्नं विसरलेलं असतो आणि 10 मिनिटांनी आपण 90 टक्के स्वप्न विसरलेले असतो. (Image Credit : Lucid Dream Society)
3 / 11
2. जर कोणाला स्वप्न पडत नसतील तर हे Psychological Disorder असू शकतं.
4 / 11
3. आपण आपल्या स्वप्नामध्ये फक्त त्याच लोकांना पाहतो, ज्यांना आपण आपल्या आयुष्यात ओळखत असतो (Image Credit : New Scientist)
5 / 11
4. जोपर्यंत छोटी मुलं 3 ते 4 वर्षांची होत नाहीत, तोपर्यंत त स्वतःला स्वप्नामध्ये पाहू शकत नाहीत. (Image Credit : thegood.co)
6 / 11
5. जर एखादी व्यक्ती ब्लॅक अॅन्ड व्हाइट टिव्ही पाहून मोठी झाली असेल तर त्या व्यक्तीला पडणारी स्वप्नही ब्लॅक अॅन्ड व्हाइट असतात. (Image Credit :Tech and Facts)
7 / 11
6. साधरणतः प्रत्येक रात्री आपण 1 ते 2 तासांसाठी स्वप्न पाहतो, ज्यामध्ये 4 ते 7 वेगवेगळ्या स्वप्नांचा समावेश असतो. (Image Credit :makingindiaonline.in)
8 / 11
7. स्वप्न पाहताना तुम्ही वाचू शकत नाही. (Image Credit : chitralekha.com)
9 / 11
8. पुरूष आणि महिलांना पडणारी स्वप्न वेगवेगळी असतात. पुरूषांमध्ये हिंसक आणि आक्रमक स्वप्न पाहण्याची क्षमता अधिक असते. त्याऐवजी महिला पुरूषांबाबत अधिक स्वप्न पाहतात. (Image Credit : lifeteach.in)
10 / 11
9. दिवसापेक्षा झोपलेलं असताना आपला मेंदू जास्त सक्रिय असतो. (Image Credit : IFLScience)
11 / 11
10. पाळीव प्राणीही स्वप्न पाहतात. (Image Credit : consciousreminder.com)
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्य