शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दीक्षांत सोहळा : २०१८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:58 PM

1 / 8
सुवर्णपदक प्राप्त केल्यानंतर एका विद्यार्थीनीचे आजीबाईने असे कौतुक केले.
2 / 8
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ वा पदवीप्रदान समारंभ मंगळवार, २७ रोजी पार पडला. यावेळी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना डॉ.अशोक जोशी
3 / 8
पदवी प्रदान समारंभानंतर एका विद्यार्थीनीने आपल्या पालकांसोबत फोटो घेतला.
4 / 8
आपल्या यशाचे खरे शिल्पकार आपले आई-वडिल असल्याचे सांगत एका विद्यार्थीनने सुवर्णपदक वडिलांच्या गळ्यात टाकले.
5 / 8
पदवीप्रदान समारंभात ३५ हजार १६४ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये २२२ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.
6 / 8
पदवीप्रदान समारंभानंतर विद्यार्थीनींनी विद्यापीठाच्या हिरवळीवर सेल्फी घेत हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये साठविले.
7 / 8
डॉ.अशोक जोशी यांच्या हस्ते गुणवंतांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सुवर्णपदक बहाल करण्यात आले.
8 / 8
दीक्षांत मिरवणूकीत प्रमुख अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी होते.
टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव