जगातील सर्वात श्रीमंत माणसाकडे आहे इतकी अमाप संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 23:15 IST2019-06-18T22:55:01+5:302019-06-18T23:15:36+5:30

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांची गणना जगातील सध्याचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून केली जाते. उंची जीवन जगणाऱ्या जेफ बेजॉस यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. त्यातील काही गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
वॉशिंग्टनमधील म्युझियमसारखे घर
जेफ बेजॉस यांच्याकडे वॉशिंग्टनमध्ये एक घर आहे. एकेकाळी म्युझियम असलेल्या या घराची किंमत सुमारे १६० कोटी रुपये इतकी आहे.
प्रायव्हेट जेट
जेफ बेजॉस यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे विमान आहे. त्याची किंमत ६५ दशलक्ष डॉलर इतकी आहे.
१० हजार वर्षांचे घड्याळ
जेफ बेजॉस एक असे घड्याळ तयार करवून घेत आहेत जे १० हजार वर्षे चालेल. त्यासाठी त्यांनी २९३ कोटी रुपये खर्च केले आहेत.
जेफ बेजॉस यांची न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क येथे १० हजार स्क्वेअर फीटची अपार्टमेंट आहे.
जेफ बेजॉस यांनी १४१ वर्षे जुने वृत्तपत्र असलेले वॉशिंग्टन पोस्टची खरेदी केली आहे. त्यांनी २३ कोटी डॉलरला या वृत्तपत्राची खरेदी केली होती.
जेफ बेजॉस हे अंतराळ प्रवास नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी ब्लू ऑरिजिन कंपनीची स्थापना केली आहे.
जेफ बेजॉस हे २०१८ मध्ये एका रोबो डॉगसोबत दिसले होते. स्पॉट मिनी नावाचा हा रोबो डॉग बोस्टन डायनेमिक्सने बनवला होता.
जेफ बेजॉस यांची कॅलिफोर्नियामधील बेवर्ली हिल येथे एक हवेली आहे.
जेफ बेजॉस यांचे वॉशिंग्टनजवळ एक लेक हाऊस आहे. १९९८ मध्ये त्यांनी याची खरेदी केली होती. त्यांच्या या लेक हाऊसशेजारी बिल गेट्स यांचासुद्धा बंगला आहे.
जेफ बेजॉस यांच्याकडे अनेक आलिशान कारचा ताफा आहे. त्यापैकी होंडा अकॉर्ड आणि शेवरोलेट ब्लेझरची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली आहे.
अमेरिकेतील सिएटल येथे अॅमेझॉनचे मोठे ऑफीस आहे. हे ऑफीस बांधण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला होता.