१०० दिवस एकच ड्रेस घालून केला रेकॉर्ड; मिळालं 'हे' बक्षिस

By जयदीप दाभोळकर | Published: January 9, 2021 12:43 PM2021-01-09T12:43:40+5:302021-01-09T12:54:56+5:30

जर तुम्हाला विचारलं की एकच ड्रेस तुम्ही किती दिवस घालू शकाल? तर तुमचं उत्तर काय असेल ? एक दिवस किंवा जास्तीत जास्त दोन दिवस. परंतु एका मुलीनं एक ड्रेस जवळपास ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी परिधान करून एक विक्रम बनवला आहे. (सर्व फोटो - Instagram/@thisdressagain)

बॉस्टन येथे राहणाऱ्या सारा रॉबि्स या मुलीनं एकच ड्रेस १०० दिवसांपर्यंत घालून एक विक्रम केला आहे. यानंतर ती मुलगी चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉस्टनमध्ये राहणाऱ्या सारा रॉबिन्सनं एकच ड्रेस सलग १०० दिवस घातला असला तरी तिनं तो ड्रेस निरनिराळ्या स्टाईनलनं घातला होता. तिनं तो टॉप कधी स्कर्टसह तर कधी जिन्ससह घातला होता.

तिनं १६ सप्टेंबर २०२० रोजी १०० दिवसांच्या ड्रेस चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. द मिररच्या अहवालानुसार तिनं १०० दिवस तोच ड्रेस घालून आपली सर्व कामंही केली. तर अनेकदा तिनं समारंभांमध्येही हजेरी लावल्याचं सांगण्यात आलं.

"या चॅलेंजनं मला एक नवी प्रेरणा दिली. मी १ जानेवारी २०२० ते १ जानेवारी २०२२ यादरम्यान कोणत्याही नव्या कपड्यांची खरेदी करणार नाही," असं सारानं सांगितलं.

"मला यादरम्यान समजलं की माझ्या या वयात माझ्याकडे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी निरनिराळे कपडे आहेत. जे कपाटातच अशीच धुळ खात पडले आहेत. परंतु मी येणाऱ्या काळात कोणत्या कपड्यांना पसंती देईन हे मी नंतर पाहिनच," असंही ती म्हणाली.

सारानं १६ सप्टेंबर २०२० रोडी १०० दिवसांच्या ड्रेस चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता.

आपण नव्या फॅशनशिवाय राहू आणि कपडे जास्त धुण्यानं पृथ्वीला होणारं नुकसान टाळू शकू यासाठी तिनं या चॅलेंजमध्ये सहभाग घेतल्याचं म्हटलं.

१०० दिवसांच्या चॅलेंजची सुरूवात कपड्यांचा ब्रँड वूल अँड नं केली होती. ज्या लोकांनी यात सहभाग घेतला होता त्यातील विजेत्यांना नवे ड्रेस खरेदी करण्यासाठी १०० डॉलर्सचे व्हाऊचर्स देण्यात आले.

या चॅलेंजचा उद्देश ना केवळ एक दिवसात एक ड्रेस परिधान करण्याची सवयीत बदल करण्याचा होता. तर कपडे धुण्यासाठी लागणारा खर्च कमी करणं आणि ते धुण्याचा भारही कमी हा उद्देश असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं.