कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:19 IST2025-12-31T13:57:51+5:302025-12-31T14:19:56+5:30
Who is Tatiana Schlossberg: तातियानाच्या मृत्यूची बातमी जेएफके लायब्ररी फाउंडेशनने इंस्टाग्राम पोस्टमधून दिली

Who is Tatiana Schlossberg:
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची नात तातियाना श्लोसबर्ग हिचे एका दुर्मिळ आजाराने निधन झाले. अवघ्या ३५व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतल्या.

जेएफके लायब्ररी फाउंडेशनने त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली की, आमच्या लाडक्या तातियाना हिचे आज सकाळी निधन झाले. ती नेहमीच आमच्या हृदयात राहील.

नोव्हेंबरमध्ये एका लेखात तातियानाने तिच्या आजाराबद्दल खुलासा केला होता आणि सांगितले होते की तिला जगण्यासाठी एक वर्षापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे.

तातियानाने २०२४मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आणि चाचणीनंतर तिला असाध्य आजार आढळून आला होता.

तातियानाने लेखात लिहिले की, मला एका गंभीर आजाराचे निदान झाले आहे. डॉक्टरांनी तिला मायलॉइड दुर्मिळ असा म्यूटेशन मायलॉइट ल्यूकेमिया पद्धतीचा कर्करोग झाल्याचे सांगितले.

तातियाना श्लोसबर्ग ही राष्ट्राध्यक्ष केनेडी यांची नात, पत्रकार आणि पर्यावरण लेखिका होती. ती कॅरोलिन केनेडी आणि डिझायनर एडविन श्लोसबर्ग यांची मुलगी होती.

१९९० मध्ये जन्मलेल्या तातियानाने राजकीय वारसा सोडून करिअर निवडले. तिने हवामान आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल पत्रकार म्हणून काम केले.

द न्यूयॉर्क टाईम्ससह प्रमुख अमेरिकन मीडिया हाऊससाठी तिने लिखाण केले. हवामान आणि पर्यावरण पत्रकार म्हणून तातियानाची कारकीर्द यशस्वी झाली.

तातियानाने २०१७मध्ये डॉ. जॉर्ज मोरन यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली. मात्र तातियानाला झालेल्या आजाराशी तिची झुंज अपयशी ठरली.
















