शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोण आहेत 'या' नेपाळच्या नेत्या? त्यांच्या घरावर भारताची बाजू मांडली म्हणून झाला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 3:53 PM

1 / 9
नेपाळने लिपुलेख हा भारताचा भूभाग नेपाळच्या नकाशात दाखविला आहे. हा नकाशा बदलण्यासाठीचे दुरुस्ती विधेयक नेपाळच्या संसदेमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात आले. मात्र, या विधेयकाला विरोध करणाऱ्या हिंदू खासदार सरिता गिरी आता अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या घरावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
2 / 9
सरिता गिरी या नेपाळच्या पहिल्या खासदार आहे, ज्यांनी नकाशा दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविला आहे. 2007 मध्ये मधेशी समाजाच्या हितासाठी राजकारणात आलेल्या सरिता गिरी यांना राजकारणाची चांगलीच समज आहे.
3 / 9
सरिता गिरी नेपाळच्या जनता समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत. नेपाळच्या हितापेक्षा भारतीय हितसंबंधांचा विचार करतात, असा त्यांच्यावर नेहमी आरोप असतो. त्या भारतीय असून त्यांनी नेपाळी नागरिकाशी लग्न केले आहे.
4 / 9
नेपाळमधील एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सरिता गिरी यांनी कालापानी भागाचा देशाच्या नव्या नकाशामध्ये समावेश करण्याच्या नेपाळ सरकारने घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या खासदारांना आश्चर्य वाटले.
5 / 9
नेपाळ सरकारद्वारे नवीन नकाशाला संसदेचा भाग बनविण्यासाठी आणलेल्या घटना दुरुस्ती प्रस्तावावर आपला वेगळा दुरुस्ती प्रस्ताव ठेवताना जनता समाजवादी पक्षाच्या खासदार सरिता गिरी यांनी तो फेटाळण्याची मागणी केली आहे.
6 / 9
या विरोधामुळे आता खासदार सरिता गिरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. त्याच्या घरावर काळे झेंडा लावून देश सोडण्याची धमकी देण्यात आली. या घटनेची माहिती सरिता गिरी यांनी पोलिसांना दिली. पण पोलीस त्यांच्या मदतीसाठी पोहोचले नाहीत. अगदी त्याच्या पक्षाने त्यांना त्यांच्यापासून दूर केले आहे.
7 / 9
नेपाळच्या संसदेत गेल्या आठवड्यात नकाशा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सरकारच्या वतीने संसदेत नकाशाशी संबंधित घटना दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला, त्याच दिवशी नेपाळच्या राजपत्रात तो प्रकाशित करण्यात आला होता.
8 / 9
जनता समाजवादी पक्षाच्या खासदार सरिता गिरी यांनी हा नवीन सरकारचा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली असता, त्यांच्या पक्षानेही हा दुरुस्ती प्रस्ताव मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, प्रस्ताव मागे घेतला नाही तर पक्षाकडून निलंबन कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला दिला.
9 / 9
याआधी संसदेत सहभागी झालेले सर्व पक्ष नकाशा दुरुस्तीच्या बाजूने बोलले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु भारताच्या बाजूने असलेल्या मधेशी पक्षाने संसदेत विरोध केला नाही. सरिता गिरी पहिल्या खासदार आहेत ज्यांनी या दुरुस्तीला विरोध दर्शविला आहे.
टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत