CoronaVirus: कोरोनाचं नवं केंद्र निश्चित?; कोट्यवधींची धाकधूक वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 3:32 PM
1 / 11 चीनच्या हुवानमधून कोरोना जगभरात पसरला. सध्या कोरोनामुळे जगात खळबळ माजलीय. 2 / 11 कोरोनानं सर्वात आधी चीनमधून थैमान घातलं. चीनमध्ये कोरोनानं ३ हजारहून अधिक जणांचा बळी घेतला. 3 / 11 चीननंतर कोरानानं युरोपात थैमान घातलं. इटली, स्पेन, फ्रान्समध्ये कोरोनानं १२ हजारपेक्षा जास्त जणांचा बळी गेला. 4 / 11 चीनपेक्षा इटलीला कोरोनाचा जास्त फटका बसलाय. कोरोनामुळे इटलीत साडे सात हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. 5 / 11 इटलीची आरोग्य यंत्रणा जगातील सर्वात्तम पाचांमध्ये गणली जाते. मात्र कोरोना संकटापुढे तीदेखील मोडकळीस आलीय. 6 / 11 चीन पाठोपाठ युरोपाला तडाखा दिल्यानंतर आता कोरोना अमेरिकेत थैमान घालतोय. अमेरिकेत कोरोनामुळे १ हजारपेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले आहेत. 7 / 11 युरोपनंतर आता अमेरिका कोरोनाचं पुढचं केंद्र असू शकतं, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. 8 / 11 अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी दिली. 9 / 11 गेल्या २४ तासांमध्ये जगभरात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी ८५ टक्के रुग्ण युरोप आणि अमेरिकेतले आहेत. यातले ४० टक्के रुग्ण अमेरिकेन आहेत. 10 / 11 अमेरिका कोरोनाचं पुढील केंद्रस्थान ठरू शकतो. मात्र अमेरिकन आरोग्य यंत्रणा ही परिस्थिती टाळू शकतात. त्यांच्याकडून परिस्थिती कशी हाताळली जाते, यावर सर्वकाही अवलंबून असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. 11 / 11 अमेरिकेत कोरोनाचे ६८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. चीन आणि इटलीनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्म अमेरिकेत आहेत. आणखी वाचा