Vladimir Putin यांचे 'आलिशान ड्रीम हाऊस', याठिकाणी गर्लफ्रेंडसोबत घालवतात क्वालिटी टाइम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:43 PM2023-03-03T16:43:30+5:302023-03-03T16:50:40+5:30

Vladimir Putin : मॉस्कोपासून 250 मैल अंतरावर असलेल्या वल्दाई येथील जंगलात ही प्रॉपर्टी आहे.

व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी 1996 मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांत आपली प्रॉपर्टी तयार केली. मॉस्कोपासून 250 मैल अंतरावर असलेल्या वल्दाई येथील जंगलात ही प्रॉपर्टी आहे.

1999 पासून व्लादिमीर पुतीन यांनी रशियाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुतीन यांनी सेंट पीटर्सबर्गमध्ये 'गोल्डन हाऊस'सारखे घर बांधण्याचा प्रयत्न केला, ज्याला विंटर पॅलेस देखील म्हटले जाते.

व्लादिमीर पुतीन यांनी पत्नी ल्युडमिला ओचेरेत्नाया (Lyudmila Ocheretnaya) यांच्याशी अधिकृतपणे घटस्फोट घेतल्यानंतर आपली 39 वर्षीय गर्लफ्रेंड काबेवा यांना घरी बोलावले. त्यानंतर पुतीन यांनी 2020 मध्ये गर्लफ्रेंड काबेवासाठी नवीन घर बांधण्यास सुरुवात केली. जे 'गोल्डन हाऊस' पासून फार दूर नाही.

रिपोर्ट असे म्हटले आहे की, 2021 मध्ये काबेवा यांच्या घराजवळ बोट डॉक बांधण्यात आले. तेथून, एका छोट्या कालव्यातून 28-हेक्टर (70- एकर) मध्ये पसरलेल्या एका आलिशान महल पार्कत जाण्यासाठी बोटीचा वापर केला जाऊ शकतो.

सोलारियमसह एक मोठा स्पा कॉम्प्लेक्स, क्रायो चेंबर, 25-मीटरचा स्विमिंग पूल, हमाम, सौना, मड रुम, मसाज बाथ, कॉस्मेटोलॉजी आणि डेन्टिस्टरी एरिया पुतीन आणि काबेवा यांच्या घरांपासून साधारणपणे समसमान अंतरावर आहे.

याशिवाय, तलावाच्याकडेला पुतीन यांच्या खासगी आर्मर्ड ट्रेनचाही समावेश आहे. त्यांच्या घराजवळ एक सुरक्षित स्टेशन उभारण्यात आल्याचे प्रोएक्टमध्ये सांगण्यात आले. प्रोएक्टद्वारे घेतलेल्या घराच्या सॅटलाइट फोटोंमध्ये रेल्वे स्टेशन्स दिसू शकतात.

पुतीन यांच्या जवळच्या सोची आणि नोवो-ओगारियोवो या रशियन शहरांमध्ये त्यांच्या निवासस्थानासाठी खाजगी रेल्वे स्टेशन आहे. रिपोर्टनुसार, प्रोएक्ट पत्रकारांनी केलेल्या तपासणीत रशियन राष्ट्राध्यक्षांच्या त्यांच्या मालमत्तेशी संबंधीत अनेक तथ्ये उघड झाली.