शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सरकारी गाडीने क्लबमध्ये पोहोचली, डीजे बनून अशी साजरी केली पुतिन यांच्या 'सीक्रेट मुलीने' बर्थडे पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 4:36 PM

1 / 10
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची लव चाईल्ड म्हटली जाणारी मुलगी लुईजा रोजोवाने नुकताच आपला १८वां वाढदिवस साजरा केला. तिला पुन्हा एकदा सरकारी कारमध्ये बघण्यात आलं. लुईजाने आपल्या बर्ड डेच्या दिवशी मॉक्सोतील एका लोकप्रिय नाइट क्लबमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टीही केली.
2 / 10
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, स्पेशल यूनिटचे अनेक पोलीस या नाइट क्लबच्या आजूबाजूला साध्या कपड्यांमध्ये उपस्थित होते. त्यासोबतच तिथे असलेल्या काही पत्रकारांनाही हटवण्यात आलं होतं.
3 / 10
लुईजाच्या परफॉर्मन्ससाठी हा क्लब पूर्णपणे भरला होता. हे कुणालाच माहीत नव्हतं की, लुईजा इथे येत आहे. लुईजाबाबत म्हटले गेले होते की, सेंट पीटर्सबर्गहून एक सीक्रेट गेस्ट नाइट क्लबमध्ये परफॉर्म करण्यासाठी येणार आहे.
4 / 10
लुईजा म्हणाली होती की, ती एका साध्या पिवळ्या टॅक्सीतून क्लबमध्ये पोहोचली होती. पण रिपोर्ट्सनुसार ती एका सरकारी बीएमडब्ल्यू ७ मध्ये तिथे पोहोचली होती.
5 / 10
ही गाडी याआधी रशियाचे कल्चर मिनिस्टर आणि रशियातील व्हॅटिकनचे अॅम्बेसेडर यांनीही वापरली आहे. लुईजाला तिच्या मित्रांनी तिला ऑनलाइन विश केलं आणि ही पार्टी रात्री उशीरापर्यंत सुरू होती
6 / 10
ब्रॅडफोर्ड यूनिव्हर्सिटीचे व्हिज्युअल कॉम्प्युटर एक्सपर्ट हसनने दावा केला आहे की, लुईजाचा चेहरा पुतिन यांच्या चेहऱ्याशी फार मिळता जुळता आहे. तो म्हणाला की, ती तिच असू शकते. मात्र, लुईजाबाबत पुतिन यांनी कधीही कुठेही उल्लेख केला नाही.
7 / 10
दरम्यान लुईजा सोशल मीडियावर अॅक्टिव आहे आणि ती नेहमीच तिच्या फोटोंमध्ये लक्झरी ब्रॅन्डसोबत दिसत असते. लुईजाला तिच्या अनेक फॅन्स आणि मित्रांनी शुभेच्छा दिल्या.
8 / 10
रशियातील इन्वेस्टिगेटीव साइट Proekt ने दावा केला होता की, ९०च्या दशकात लुईजाची आई स्वेतलाना हाऊसकिपर होती. तेव्हाच तिची भेट पुतिन यांच्याशी झाली होती.
9 / 10
इकॉनिमिक्सची डिग्री असलेल्या स्वेतलानासोबत भेट झाली तेव्हा पुतिन हे एफएसबीचे हेड होत आणि विवाहित होत.
10 / 10
२००३ मध्ये त्यांची लव चाईल्ड म्हटली जाणारी एलिजावेता उर्फ लुईजाचा जन्म झाला होता. तेच पुतिन यांच्यासोबत नातं ठेवल्यानंतर स्वेतलानाची संपत्ती रातोरात वाढली होती. त्यावरून पुतिन यांच्यावर टिकाही झाली होती.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स