शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक चूक अमेरिकेला पडली महागात; चीनच्या हाती लागणार प्रचंड मोठं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 5:14 PM

1 / 11
अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केला असून देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानं लाखो लोकांना देश सोडायचा आहे.
2 / 11
अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तान काबीज केला. अमेरिकेनं केलेल्या चुकीचा मोठा फटका अफगाणी नागरिकांना बसला आहे. तर अमेरिकन सरकारच्या निर्णयाचा मोठा फायदा चीनला होणार आहे.
3 / 11
अफगाणिस्तानमधील जमिनीच्या पोटात असलेल्या दुर्मीळ खजिन्याची चावी तालिबानच्या हाती लागली आहे. अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात असल्यानं लवकरच चीनला मोठी लॉटरी लागणार आहे.
4 / 11
चीननं आधीपासूनच तालिबानचं समर्थन केलं असून सरकारला मान्यतादेखील दिली आहे. अफगाणिस्तानात दुर्मीळ खनिजांचा मोठा साठा आहे. जमिनीच्या पोटात तांबं, क्रोमाईटचं भांडार आहे. तालिबान आणि चीनचे संबंध पाहता या खजिन्याची चावी लवकरच चीनला मिळू शकते.
5 / 11
अफगाणिस्तानात असलेल्या दुर्मीळ खजिन्याचं मूल्य १ ट्रिलियन ते ३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. हे प्रचंड घबाड मिळवण्यासाठी चीननं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
6 / 11
तालिबाननं काबूलवर कब्जा करताच चीनमधील खाण मालकांनी लगेचच हालचाली सुरू केल्या. जगातील दुसऱ्या क्रमाकांची तांब्याची खाण विकसित केलेल्या एका चिनी कंपनीनं अफगाणिस्तानात पुन्हा काम सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
7 / 11
अफगाणिस्तानातला अंमली पदार्थांचा व्यवसाय मोठा आहे. त्यानंतर खाण उद्योगाचा क्रमांक लागतो. याचसाठी चीननं अफगाणिस्तानवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
8 / 11
तालिबानसोबत दोन हात करत असताना अमेरिकन लष्कराचे अनेक कमांडर खाणीशी संबंधित उद्योगांमध्ये सहभागी होते. नाटोच्या लष्करी तळावर त्यावेळी एक क्रोमाईट क्रशर बसवण्यात आला. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या या क्रशरची किंमत तब्बल ३.८ मिलियन डॉलर इतकी आहे.
9 / 11
क्रोमाईटचा वापर स्टेनलेस स्टील आणि विमानांसाठीच्या पेंटमध्ये केला जातो. सध्या तालिबानच्या मदतीशिवाय हा क्रशर कार्यान्वित होऊ शकत नाही.
10 / 11
अमेरिकन जियोलॉजिकल सर्वेनुसार, अफगाणिस्तानात ६ कोटी मेट्रिक टन तांबं, २.२ अब्ज टन लोखंडी खनिज, १.४ मिलियन टन आरईईचं (लॅथेनम, सीरियम, नियोडिमियम, ऍल्म्युनियम, सोनं, चांदी, जिंक, पारा आणि लीथियम) भांडार आहे.
11 / 11
काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात सर्वात मोठं एलईईचं भांडार आहे. जगातला सर्वात मोठा लीथियम साठी बोलिव्हियाकडे आहे. तितकाच मोठा साठा अफगाणिस्तानकडेदेखील असू शकतो असा पेंटॉगॉनमधील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानchinaचीन