शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

या आहेत जगातील अशा तीन जागा, जिथे माणसाला जाण्यास आहे सक्त मनाई, त्यापैकी एक आहे भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 15:36 IST

1 / 6
आपलं जग है वैविध्याने भरलेलं आहे. इथे उंच पर्वतरांगांपासून अथांग समुद्र आहेत. मात्र मानवाने मोठ्या प्रमाणात प्रगती करत संपूर्ण जग पादाक्रांत केलं आहे. मात्र आजही जगात अशा तीन जागा आहेत जिथे मानवाला त्यातही सर्वसामान्य माणसांना जाण्यास सक्त मनाई आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यातील एक जागा ही भारतात आहे.
2 / 6
या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरील नाव आहे ते म्हणजे एरिया ५१. एरिया ५१ हे अमेरिकेमधील नेवाडा येथील ए अत्यंत गोपनीय लष्करी केंद्र आहे. अमेरिकन सरकार इथे लष्करी चाचणी केंद्र असल्याचे सांगते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथे सर्वसामान्यांच्या प्रवेशास मनाई आहे.
3 / 6
याच एरिया ५१ मध्ये अनेकदा यूएफओ दिसल्याचा दावा या भागाच्या आजूबाजूला राहणारे लोक करतात. मात्र अमेरिकन सरकारने हे दावे नेहमीच फेटाळून लावले आहेत.
4 / 6
या यादीमधील दुसरं नाव आहे ते म्हणजे स्नेक आयलँड. स्नेक आयलँड या बेटावर अतिविषारी साप मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ब्राझील सरकारने येथे सर्वसामान्य मानवांच्या प्रवेशास मनाई केली आहे.
5 / 6
या यादीमधील तिसरं ठिकाण आहे ते म्हणजे उत्तर सेंटिनल बेट. उत्तर सेंटिनल बेट हे भारतामधील अंदमान निकोबार बेटांच्या समुहातील एक बेट आहे. हे बेट अत्यंत संरक्षित क्षेत्र आहे. येथील सेंटिनल रहिवासी हे बाहेरील संपर्कापासून कायम दूर राहतात.
6 / 6
येथील आदिवासी समुदायाच्या पारंपरिक जीवनाचं रक्षण करण्यासाठी येथे जाणं प्रतिबंधित करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या कायद्यानुसार या बेटाच्या आजूबाजूला जाण्यास सक्त मनाई आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतUnited StatesअमेरिकाBrazilब्राझीलJara hatkeजरा हटके