शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:41 IST

1 / 5
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाकडून २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी एलिसा कार्सन या अमेरिकन विद्यार्थिनीची निवड केली आहे. एलिसा ही नासाच्या मंगळ मोहिमेच्या माध्यमातून मंगळ ग्रहाकडे झेप घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण एलिसा कार्सनबाबत अधिक जाणून घेऊयात.
2 / 5
एलिसा कार्सन हिचा जन्म १० मार्च २००१ रोजी अमेरिकेत झाला. सध्या पीएचडी करत असलेल्या एलिसा हिला बालपणापासूनच अंतराळाची आवड होती. एलिसा हिने अगदी कमी वयात नासाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती.
3 / 5
एलिसा हिने तिचं प्राथमिक शिक्षण बॅटन रूज इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं होतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने २०२३ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एस्ट्रोबायोलॉजीमध्ये पदवी मिळवली. आता ती ख इस समय कार्सन अर्कांसस यूनिवर्सिटी से अवकाश आणि ग्रहविज्ञान या विषयामधून पीएचडी करत आहे.
4 / 5
उल्लेखनीय बाब म्हणजे एलिसा हिने वयाच्या सोळाव्या वर्षीच पीओएसएसयूएम स्पेस अकादमीमध्ये सहभाग घेतला होता. हा अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रातील एक विकसित प्रशिक्षण कार्यक्रम आहे. एवढंच नाही तर वयाच्या १८ व्या वर्षीच तिने वैमानिकाची पदवी मिळवली होती. तसेच तिने जी-फोर्स ट्रेनिंग, माक्रोग्रॅव्हिटी उड्डाण, स्कूबा डायव्हिंग आणि डिकंप्रेशनसारखी प्रशिक्षणं पूर्ण केली आहेत.
5 / 5
एलिसा कार्सन हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, जर मी मंगळ ग्रहावरील मोहिमेतून सुखरूप परत आले तर मला शिक्षिका किंवा राष्ट्रपती बनायला आवडेल. मला जिथे जायचं आहे तिथून पृथ्वीवर परत येणं कठी आहे, याची जाणीव मला आहे, असेही ती सांगते. मात्र नासाने तिच्या या वक्तव्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टॅग्स :NASAनासाMarsमंगळ ग्रहStudentविद्यार्थीscienceविज्ञान