हे आहेत मालवाहून जहाजांना झालेले मोठे अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 04:07 PM2019-08-22T16:07:46+5:302019-08-22T16:27:04+5:30

खोल समुद्रातून हजारो किलोमीटर प्रवास करणारी मालवाहू जहाजे जेव्हा बंदरांच्या दिशेने येतात तेव्हा धोका वाढतो. तसेच यादरम्यानच मोठे अपघात होण्याची शक्यता बळावते. आज नजर टाकूया मोठ्या मालवाहू जहाजांच्या अशाच काही अपघातांवर.

सीएससीएल इंडियन ओशन या मालवाहू जहाजाची गणना जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांमध्ये होते. दरम्यान, 2016 मध्ये हे जहाज जर्मनीतील हॅम्बर्ग शहरात अपघातग्रस्त झाले होते. त्यावेळी या वजनदार जहाचाचा पृष्टभाग नदीच्या तळाला टेकला होता. अखेरीस खूप प्रयत्नांती या जहाजाला बाहेर काढण्यात यश मिळाले होते.

ऑक्टोबर 2011 मध्ये रायना हे मालवाहक जहाज न्यूझीलंडजवळ समुद्रातील खडकावर आपटून अपघातग्रस्त झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की त्या जहाजाचे दोन तुकडे झाले होते.

2007 मध्ये इंग्लंडच्या किनाऱ्याजवळ नेपल्स हे मालवाहू जहाज अपघातग्रस्त होऊन काही कंटेनर समुद्रात पडले होते. तसेच या जहाजातील कचरा किनाऱ्यावर आला होता.

1999 मध्ये इंग्लंड आणि फ्रान्सच्या समुद्रादरम्यान एक क्रूझ जहाज अपघातग्रस्त झाले होते. मात्र या मोठ्या अपघातात 24 जण किरकोळ जखमी झाले. पण मोठी दुर्घटना टळली.

मोठ्या प्रमाणात जलवाहतूक चालणाऱ्या ऱ्हाइन नदीमध्ये एक जहाज प्राणापेक्षा जास्त वळल्याने काही कंटेनर पाण्यात पडले होते. त्यामुळे या नदीतून होणारी मालवाहतूक राही दिवस बंद ठेवावी लागली होती.

2014 मध्ये उत्तर समुद्रात काही कंटेनर पडले होते. त्यातून बुटांचे जोड वाहत वाहत उत्तर जर्मनीच्या किनाऱ्यापर्यंत आले होते.